‘दैनिक लोकसत्ता’ने ‘सनातन संस्थेवरील बंदीची मागणी योग्य कि अयोग्य’ या घेतलेल्या मतचाचणीमध्ये नागरिकांचा कौल सनातन संस्थेच्या बाजूने !

‘मदरशांवर बंदी घालावी का ?’, ‘मुसलमानांनी वन्दे मातरम् न म्हणणे योग्य आहे का ?’ अशा काही प्रश्‍नांवरही ‘लोकसत्ता’ने मतचाचणी घ्यावी !

मुंबई – ‘दैनिक लोकसत्ता’कडून ४ डिसेंबर या दिवशी ‘#LoksattaPoll’ या ‘हॅश टॅग’वर ‘सनातन संस्थेवर उद्धव ठाकरे यांनी बंदी घालावी, ही हुसेन दलवाई यांची मागणी योग्य वाटते का ?’ या प्रश्‍नाद्वारे मतचाचणी घेतली. या मतचाचणीमध्ये ४१ टक्के नागरिकांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी योग्य असल्याचे,  तर ५९ टक्के नागरिकांनी सनातन संस्थेवरील बंदीची मागणी योग्य नसल्याचे मत नोंदवले आहे. या मतचाचणीमध्ये ३ सहस्र ८ जणांनी सहभाग घेतल्याचे ‘ट्वीटर’वर दिसत आहे.

लोकसत्ताने घेतलेल्या या मतचाचणीविषयी अनेकांनी नापसंती व्यक्त केली आहे. यामध्ये ‘जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत बंदी कशी घालणार ?’ असा प्रश्‍न काहींनी उपस्थित केला आहे.  एका वापरकर्त्याने ‘असे मतचाचणी घेऊन लोकसत्ताने स्वत:चे हिंदुद्वेष्टे रूप दाखवून दिले आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अन्य एकाने ‘‘लोकसत्ता सुपारी पत्रकारिता करतो का ?’, यावर मतचाचणी घ्या. बघू किती लोक ‘नाही’ असे उत्तर देतात’, असा संदेश लिहिला आहे. अनेकांनी ‘राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालणे अत्यंत चुकीचे आहे’, असे मत नोंदवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment