रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला महारुद्रयाग

यागाच्या पूर्णाहुतीच्या वेळी मंत्र म्हणतांना डावीकडून श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. दामोदर वझेगुरुजी आणि उभे असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पूर्णाहुती देतांना श्री. अमर जोशी अन् श्री. ईशान जोशी

रामनाथी (गोवा) – कर्नाटक येथील विनयगुरुजी यांच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात २५ नोव्हेंबर २०१९ या दिवशी महारुद्रयाग भावपूर्ण वातावरणात करण्यात आला. प्रारंभी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि साधकांच्या साधनेत येत असलेले आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत’, असा संकल्प सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. त्यानंतर शिवलिंगावर अभिषेक आणि पूजा करण्यात आली. यजुर्वेदातील रुद्रपठण करून यागात काळ्या तिळांच्या आहुती देण्यात आल्या. सनातनच्या पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. सिद्धेश करंदीकर  आणि श्री. अमर जोशी यांनी या यागाचे पौरोहित्य केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment