रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला श्री काळभैरवयाग

श्री काळभैरव पूजनाच्या वेळी करण्यात आलेली पूजेची मांडणी

रामनाथी (गोवा) – कर्नाटक येथील देवीउपासक हरिशगुरुजी यांच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात कार्तिक कृष्ण पक्ष सप्तमी (१९ नोव्हेंबर २०१९) या दिनी असलेल्या श्री काळभैरव जयंतीच्या औचित्याने श्री काळभैरवयाग भावपूर्ण वातावरणात करण्यात आला. प्रारंभी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांना चांगले आरोग्य लाभावे’, असा संकल्प सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. त्यानंतर श्री काळभैरव पूजन करून काळभैरवाचे मंत्र म्हणत यागात काळ्या तिळांच्या आहुती देण्यात आल्या. सनातनच्या पुरोहित पाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. अमर जोशी, श्री. ईशान जोशी आणि श्री. चैतन्य दीक्षित यांनी या यागाचे पौरोहित्य केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment