काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांची महाराष्ट्र सरकारकडे सनातनद्वेषी मागणी
- धर्मांधांना आणि ढोंगी पुरो(अधो)गामी यांना खुश करण्यासाठी काँग्रेसवाले मधे मधे अशी बांग देत असतात, तेच हुसेन दलवाई यांनी आता केले आहे !
- राज्यात आणि केंद्रात पूर्वी काँग्रेसचे सरकार असतांना त्यांना निरपराध सनातन संस्थेवर बंदी घालणे शक्य झाले नाही. केंद्रातील तत्कालीन काँग्रेसच्या गृह खात्यानेच बंदीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता, हे स्पष्ट असतांना हुसेन दलवाई आता अशी मागणी का करत आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !
- मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतर देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात ब्राह्मणांना लक्ष्य करून त्यांच्या हत्या आणि त्यांच्या संपत्तीची हानी करण्यामागे काँग्रेस होती, असा आरोप आहे. मग काँग्रेसवरच बंदी का घालू नये ?
- देहलीत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर साडेतीन सहस्र शिखांचे हत्याकांड झाले, त्यात काँग्रेस नेते जगदीश टायटलर, कमलनाथ, सज्जनकुमार यांच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेत. या हत्याकांडाच्या संदर्भात काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की, ‘मोठा वृक्ष कोसळल्यावर धरणीकंप होणारच.’ अशा काँग्रेसवरच बंदी घातली गेली पाहिजे !
- हिंदु नेत्यांच्या हत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी हुसेन दलवाई का करत नाहीत ? कि ती इस्लामी संघटना आहे; म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत ?
नवी देहली – काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी ‘सनातन संस्था महाराष्ट्रात आतंकवाद पसरवते’, (काँग्रेसने देशात आणीबाणी लादून जो आतंकवाद निर्माण केला होता, त्यावर हुसेन दलवाई का बोलत नाहीत ? – संपादक) ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत तिचा सहभाग आहे,’ असे आरोप करून या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्रातील नव्या सरकारकडे केली आहे. (‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये सनातन संस्थेचा संबंध आहे’, असे कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने म्हटले नसतांना बिनबुडाचे आरोप करणार्या हुसेन दलवाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)
हुसेन दलवाई यांनी केलेली गरळओक . . .
१. राज्यात आता पुरोगामी विचारांचे सरकार आले आहे. काँग्रेसने तिच्या कार्यकाळात चूक केली होती; मात्र हे सरकार महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी सनातनसारख्या संस्थांवर बंदी घालण्याविषयी विचार करेल.
२. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांमागे सूत्रधार कोण आहेत, याचा शोधही सरकारने घेतला पाहिजे. (सनातनही गेली काही वर्षे हीच मागणी करत आहे. सरकारने प्रामाणिकपणे ते शोधल्यास हुसेन दलवाई यांच्यासारख्या सनातनद्वेषी लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, यात शंका नाही ! – संपादक)
३. सनातन संस्थेचे प्रमुख आठवले यांनाही कारागृहात टाकले पाहिजे. (अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असे विधान करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार ! – संपादक)
४. ‘हिंदुत्वनिष्ठ विचारांची शिवसेना सरकारमध्ये असतांना सनातन किंवा भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई होणे कितपत शक्य आहे’, असे त्यांना विचारले असता हुसेन दलवाई म्हणाले, ‘‘हे नक्कीच शक्य आहे. शिवसेनेने असल्या गोष्टींना कधीच पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्रात शांतता राहण्यासाठी हे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे.’’
(म्हणे) ‘कोरेगाव भीमा प्रकरणी संभाजी भिडे
गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही कारवाई व्हावी !’
हुसेन दलवाई यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाविषयीही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, या प्रकरणात काही लोकांना विनाकारण गोवण्यात आले आहे. या हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग होता. हे दोघेही आतंकवाद पसरवत आहेत; मात्र ते विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करणारे असल्याने त्यांना वाचवण्याचे काम केले गेले. (बोफोर्स प्रकरणात काँग्रेसवाल्यांनी कोणाकोणाला वाचवले ? भोपाळ येथील रासायनिक दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसवाल्यांनी युनियन कार्बाईडच्या अमेरिकी मालकाला का वाचवले ? हिंदूंच्या देवतांची अश्लील चित्रे काढणार्या म.फि. हुसेन यांच्यावर काँग्रेसने का कारवाई केली नाही ? जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी का घातले ? याची उत्तरे हुसेन दलवाई देऊ शकतील का ? – संपादक) त्यामुळे नव्या सरकारने यांच्याविषयीही भूमिका घ्यावी. ‘सांगलीतील दंगलीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. तशी भूमिका त्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणात घेऊ नये’, असे मी त्यांना सांगणार आहे. या लोकांना एकदा अद्दल घडली पाहिजे. (देशावर ५५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहून देशाला अधोगतीला नेणार्या काँग्रेसला जनतेने वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये ज्या प्रकारे निवडणुकीद्वारे अद्दल घडवली आहे, त्यावरून हुसेन दलवाई काहीही शिकलेले नाहीत, हेच लक्षात येते ! – संपादक)
(म्हणे) ‘सनातनवाल्यांना ठेचून काढले
पाहिजे !’ – काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार
अहो, यांना ठेचून काढले पाहिजे. बंदी कसली घालता ? सनातनच्या नावाखाली लोकांचे मुडदे पाडण्याचा अधिकार कोणी दिला ? विचारी माणसांनी विचारांनी विचार रूजवले पाहिजेत; मात्र कोणाचा रक्तपात घडवून; स्पष्टपणे एखादा विचार मांडणार्याला संपवून कोणी जर त्यांचे विचार ठसवत असतील, तर अशा लोकांना क्षमा करण्याची आवश्यकताच नाही. बंदी घालून होणार नाही, तर ही माणसे संपली पाहिजेत. यासाठी कडक कायदे केले गेले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
सनातनवर बंदी घालण्याची मागणी कोणी गांभीर्याने
केली असेल, असे वाटत नाही ! – संजय राऊत, शिवसेना
मला वाटत नाही अशा प्रकारची मागणी कोणी गांभीर्याने केली असेल. अशा प्रकारे संघटनांवर बंदी घातल्याने प्रश्न सुटत नाहीत आणि विचार मरत नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर बोलतांना केले. ‘किमान समान कार्यक्रमा’मध्ये सनातनसारखे विषय होते का ?’ या प्रश्नावर राऊत यांनी ‘अजिबात नाही’ असे उत्तर दिले.