हिंदूंनो, प्रभू श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया !

श्रीरामजन्मभूमी प्रकरणी भगवान प्रभू श्रीरामांच्या कृपेनेच सर्वोच्च न्यायालयाकडून आज समस्त हिंदु समाजाला ऐतिहासिक निर्णय मिळाला आहे, अशी आमची श्रद्धा आहे. याबद्दल प्रभु श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया. आता यथाशीघ्र भव्य श्रीराम मंदिर उभारणीचे कार्य पूर्णत्वास जाऊन कोट्यवधी हिंदूंची श्रीरामजन्मभूमीत श्रीरामाच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करूया, असे सनातन संस्थेने म्हटले आहे.

सनातन संस्था सर्व श्रीरामभक्तांना आवाहन करत आहे की, उन्माद प्रदर्शित करणार्‍या कृती टाळून पुढीलप्रमाणे सात्त्विक धर्माचरण करावे –

१. श्रीराम मंदिरामध्ये एकत्र जमून प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करावी,

२. घरामध्ये सर्वांनी एकत्रितपणे श्रीरामरक्षास्तोत्र पठन आणि श्रीरामाचा किमान 10 मिनिटे सामूहिक जप करावा,

३. घरावर गुढी उभारावी; घरासमोर सडा-रांगोळी काढावी, पणत्या प्रज्वलित कराव्यात, आकाशदीप लावावा इ.

४. घरी गोड पदार्थ बनवून देव्हार्‍यातील श्रीरामाला नैवेद्य दाखवावा, तसेच तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा,

५. श्रीराम मंदिर निर्माण शीघ्रतेने व्हावे, तसेच भारतात रामराज्याची स्थापना व्हावी, अशीही प्रार्थना करावी.

यांसारख्या श्रीरामाला अभिप्रेत असलेल्या सात्त्विक धर्माचरणाच्या कृती कराव्यात, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपला नम्र,

श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

Leave a Comment