आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.
कुलदेवता या शब्दाचा अर्थ !
‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना !
कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले.
कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व !
शीघ्र ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे अावश्यक असते, त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो; म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम १ ते २ घंटे अन् जास्तीत-जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी महालक्ष्मीदेवी असेल, तर श्री महालक्ष्मीदेव्यै नम: । असा नामजप करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा.
ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.
कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?
कुलदेवता ठाऊक नसेल, तर ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी आणि सत्संगातील अनेकांनी ही अनुभूतीघेतली आहे. ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा जप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘कुलदेवता’ या शब्दातील ‘दे’ हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. यामुळे देवतेचे तारक तत्त्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.
आता आपण ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा नामजप ऐकूया.
देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीची सविस्तर माहिती https://www.sanatan.org/mr/a/491.html या लिंकवर उपलब्ध आहे.
कुलदेवतेच्या संदर्भातील काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
१. मला साधना कारण्याची इच्छा झाल्यानंतर कुलदेवतेचे नाव माहीत नसल्याने आवडत्या श्रीगणेशाचे नामस्मरण चालू केले. केवळ पंधरा दिवसांनी माझ्या वडिलांचे आगमन झाले आणि त्यांनी मला आमची कुलदेवता ‘श्री भवानी’ असल्याचे सांगितले. – श्री. ज्ञानेश्वर हिरवे, बिरवाडी, महाड, रायगड, महाराष्ट्र.
२. एकदा कुलदेवतेच्या दर्शनाहून परतत असता माझे डोके दुखू लागले. मी सहज विनोदाने म्हटले, ‘‘आई मल्लय्या (आमची कुलदेवी), मी एवढ्या लांबून आलो आणि ही डोकेदुखी चालू झाली. तुला माझी काळजी असेल तर कृपा करून हे थांबव.’’ मला लगेचच एक जांभई आली. जांभई देतांना तोंड उघडले तेव्हा डोके दुखत होते, पण तोंड मिटले तेव्हा डोके दुखायचे थांबले होते. मी चाट झालो; पण लगेचच माझ्या लक्षात आले की, परमेश्वर सदोदित आपल्याबरोबर असतो आणि साधकांच्या अशा लहानसहान इच्छाही पूर्ण करतो. – डॉ. प्रकाश घळी, फोंडा, गोवा.
३. मी सत्संगात जाऊ लागल्यावर माझे कुलदैवत भैरी भवानीचे नामस्मरण करू लागलो. यापूर्वी मी कधी कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो नव्हतो. मी कुलदेवतेची प्रतिमाही पाहिली नव्हती; पण नामस्मरण चालू झाल्यानंतर एका रात्री झोपेत स्वप्नाद्वारे मला एका देवतेने दर्शन दिले. नंतर कुलदेवीचे छायाचित्र पाहिल्यावर कळले की, मला कुलदेवतेने दर्शन दिले आहे. – श्री. अनंत कोकबणकर, घाटकोपर, मुंबई.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’
Pls Send me Kuladevi, bhavanidevi, renukamadevi, mahalakshmidevi, saptashrungidevi, yogeshwari devi Namjap audio’s
Namaskar,
Download our ‘Sanatan Chaitanyavani’ audio app to listen to Deity chants. Download link : https://play.google.com/store/apps/details?id=sanatan.audios.musicplayer
i cant found in chaitanyavani bhavani devi, mahalakshmi devi, sptashrungi devi, yogeshwri devi namhap
Namaskar Shri. Neelkanth ji,
We are sorry to inform you that the devi chants that you requested for are not available yet on Sanatan Chaitanyavani app. But, you can listen to them on the following links –
1. Bhavani devi namjap – https://www.sanatan.org/mr/a/49879.html
2. Mahalakshmi devi namjap – https://www.sanatan.org/mr/a/616.html
3. Saptashrunhi devi namjap – https://www.sanatan.org/mr/a/618.html
4. Yogeshwari devi namjap – https://www.sanatan.org/mr/a/620.html
भवानी देवी
नमस्कार व्यंकट जी
आपल्या कुलदेवीचा नामजप ॥ श्री भवानीदेव्यै नमः ॥ असा करावा. त्याचा ऑडियो ऐकण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://www.sanatan.org/mr/a/49879.html
आपली
सनातन संस्था
From last 4 years I am doing kuldevi naam jaap and Shri gurudev datta naam jaap. But everything bad is happening in my life and family members . Why?. Does this jaap has any benefit or not.
Namaskar,
80% of problems in human life have their root cause in the spiritual dimension.
If the person has less prarabdh (destiny), then little sadhana is required to overcome it. If one has moderate prarabdh then more sadhana / spiritual practice is required to overcome it. And if the destiny is severe, then rigorous sadhana is required to overcome it.
However, doing sadhana does not mean that one will not have to face the prarabdh / destiny. Doing sadhana helps us to go through it with a strong mind. This may reduce the effect of the bad event, but it does not mean that it won’t take place at all.
We face prarabdh due to bad karmas committed by us in the previous births. So, it is bound to happen. But we can reduce its effect on us by doing sadhana.
We understand that you have been sincerely doing sadhana through all these years. If you require further help in sadhana, we can help you. Please fill our form at http://www.Sanatan.org/sampark so that seekers can contact you regarding this and guide you.
Thanks you very much. I will try to do more sadhana and also i will do it under your guidance.I will be thankful to you for the same.
अमची कुलदेवी , वाघजयी देवी आहै , आता मी अमची कुलदेवी वाघजयी देवी चे नामजप करु शकतो का, तेच्या कारण हा आहे की माला वाघजयीदेवी चे विशेष मंत्र नाही माहिती ,
नमस्कार,
लेखात कुलदेवीचा नामजप करण्याची पद्धत दिली आहे. त्यानुसार तुमच्या कुलदेवीचा नामजप पुढील प्रमाणे करू शकता – ‘श्री वाघजाईदेव्यै नमः ।’
I am suffering from severe mental diseases.can i chant kuldevi naam jaap.
Namaskar,
Yes you can chant the name of Kuldevata and Deity Dattatreya also. Please take appropriate consultation and medication for your problems from an authorized medical practitioner. Spiritual remedies should be done along with taking appropriate medical treatment. Do not replace your medical treatment with spiritual remedies.
Thanks so much i will start naam jaap from today itself thanks for the help. I have already done naam jaap of kuldevi and lord dattatreya but from last few years o stopped. I will again start the jaap and thanks for the help from all of you.
ज्योतीबा देवाचा नाम जप काय आहे, कसा होता?
नमस्कार श्री. अभि निकमजी,
ज्योतिबा देवाचा नामजप पुढील प्रमाणे करू शकता – ‘श्री ज्योतिबादेवाय नमः ।’
Mera kuladevata Hanuman hai kouna kuldevata mantra jaap karana
Namaste Nataraj ji
Aap “Shri Hanumate Namaha” jap kar sakte hain. Iska sattvik ucchar sunne ke liye https://www.sanatan.org/mr/a/516.html par click kijiye.
Aap Sanatan Chaitanyavani App par bhi yah naamjap download karke sunn sakte hain – sanatan.org/chaitanyavani
Namaste
Sanatan Sanstha
नमस्कार माझी कुलदेवी श्री चवडेश्वरी देवी आहे. मला या जपाची Audio पाहिजे आहे जो सनातन साधक कडून रेकॉर्ड झालेला असेल जसे बाकी जे जप आहे श्री गुरुदेव दत्त, ओम नमो भगवते वासुदेवाय या जपांचे जसे Audio आहे तसे.
नमस्कार प्रिया जी,
आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. क्षमा करा सध्या सनातन कडे श्री चवडेश्वरी देवीचा नामजप उपलब्ध नाही.
आपली
सनातन संस्था
नमस्कार
माझे कुलदैवत मंगसुळीचा खन्डोबा आहे. नाम स्मरण कसे करावे.
कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार सुनील जी
आपण “श्री खंडोबा देवाय नमः|” जप करू शकतात.
आपली
सनातन संस्था
धन्यवाद
amacha dev sri kedar aahe naamjap kasa karava
नमस्कार संकेत जी
आपण ‘श्री केदार देवाय नमः|’ असा जप करू शकतात.
आपली
सनातन संस्था