लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात ?

१. मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची रोपे मिळू शकणारी ठिकाणे

मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती पाहिजे असल्यास त्या पुढील ठिकाणी मिळू शकतात. त्या त्या संस्थेच्या नावापुढे कंसात संपर्क क्रमांक दिला आहे.

 

१ अ. महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठे आणि त्यांतील उपविभाग

१. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी (०२३५८-२८२०६४)

२. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (०७२४-२२५८३७२)

३. सुगंधी व औषधी वनस्पती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (०२४५२- २३४९४०८)

४. अखिल भारतीय औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल संशोधन योजना, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. (०२४२६-२४३३१५, २४३२९२)

 

१ आ. महाराष्ट्रातील काही खाजगी रोपवाटिका (नर्सरी)

१. कोपरकर नर्सरी, गवे, ता. दापोली, जि. रत्नागिरी. (०२३५८-२८२१६५/२६७५२१, ९४२२४३१२५८)

२. इको फ्रेंडली नर्सरी, परंदवाडी, सोवटणे फाट्याजवळ, जि. पुणे. (९४२२२२४३८४, ९२२५१०४३८४)

३. ए.डी.एस्. नर्सरी, कशेळे, कर्जत-मुरबाड रस्ता, जि. रायगड.

४. धन्वन्तरि उद्यान, पिंपळगाव उज्जैनी, जि. नगर. (९६७३७६९६७६)

 

१ इ. अन्य राज्यांतील महत्त्वाच्या शासकीय संस्था

१. सीएस्आय्आर् – केन्द्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थान (सीमॅप), लखनौ, उत्तरप्रदेश (०५२२-२७१८६२९)

२. औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचालनालय, बोरीयावी, गुजरात. (०२६९२-२७१६०२)

३. जवाहरलाल नेहरू कृषी विश्‍वविद्यालय, जबलपूर, मध्यप्रदेश (०७६१-२६८१७०६)

४. फाउंडेशन फॉर रीव्हायटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडीशन्स (एफ्आर्एल्एच्टी), बेंगळूरु, कर्नाटक (०८०-२८५६८०००)

 

२. अन्य ठिकाणे

अ. खेडेगावांमध्ये, तसेच त्यांच्या शेजारील जंगलात पुष्कळ औषधी वनस्पती उपलब्ध असतात. तेथील जाणत्या रहिवाशांना या वनस्पतींविषयी माहितीही असते. शहरात रहाणारे बहुतांशी लोक सुटीच्या निमित्ताने गावाला जात असतात. अशा वेळी त्यांना लागणार्‍या वनस्पतींचे बियाणे किंवा रोपे त्यांना खेडेगावांतून आणता येतील.

आ. प्रत्येक राज्याचे शेतकीखाते, तसेच वनखाते यांमध्ये औषधी वनस्पती किंवा त्या वनस्पती कोठे मिळतात, यांविषयीची माहिती उपलब्ध असते.

इ. पुष्कळ आयुर्वेदीय महाविद्यालयांच्या रोपवाटिका असतात. स्थानिक आयुर्वेदीय महाविद्यालयांना संपर्क करूनही औषधी वनस्पती मिळवता येतील.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’

 

Leave a Comment