हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे आणि साधकांचे
आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी, तसेच विश्वशांतीसाठी केला संकल्प !
रामनाथी (गोवा) – ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत यासाठी अन् विश्वशांतीसाठी येथील सनातनच्या आश्रमात कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी म्हणजे २ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्री अर्क गणपति पूजन’ केले. या वेळी पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव, पू. (श्रीमती) सुमन नाईक आणि आश्रमातील अन्य संत अन् साधक उपस्थित होते. पूजनानंतर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाल्याची अनुभूती या वेळी साधकांनी घेतली.
अर्क म्हणजे सूर्य ! सूर्यासम तेजस्वी असणारा तो श्री अर्क गणपति होय. ‘वारुळाच्या मातीचा छोटा गणपति स्थापन करून त्यावर १०८ वेळा दूर्वा वाहाव्यात, ७ सप्टेंबरपासून येणार्या प्रत्येक शनिवारी अशी ९ शनिवार ही पूजा करावी. पूजा झाल्यावर सूर्यास्ताच्या आधी वाहात्या पाण्यात गणपतीला विसर्जित करावे’, असे भृगु महर्षि यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे ही पूजा करण्यात आली. २ नोव्हेंबर या दिवशी या शृंखलेतील शेवटची पूजा पार पडली.
स्कंद षष्ठीच्या निमित्ताने झाले ‘श्री कार्तिकेय पूजन’
रामनाथी (गोवा) – स्कंद षष्ठीच्या निमित्ताने (२ नोव्हेंबर या दिवशी) सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्री कार्तिकेय पूजन’ केले. ‘साधकांचे सर्व त्रास दूर व्हावेत’, ‘साधकांची समष्टी साधना परिपूर्ण व्हावी’, असा संकल्प या वेळी करण्यात आला. भृगु महर्षि यांनी सांगितल्यानुसार श्री कार्तिकेय देवतेच्या मूर्तीवर चंदनमिश्रित गुलाबजलाने अभिषेक करण्यात आला.
क्षणचित्रे
१. स्कंद षष्ठीच्या निमित्ताने ‘श्री कार्तिकेय पूजन’ आणि शनिवार असल्याने ‘श्री अर्क गणपति पूजन’ हा योग जुळून आला. श्री कार्तिकेय आणि श्री गणपति हे दोन्ही शिवाचे पुत्र आहेत. दोन्ही देवतांचे पूजन करण्याची संधी मिळून त्यांचे आशीर्वाद लाभले, याविषयी साधकांनी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
२. वारुळाने बनवलेला श्री गणपति हा अष्टविनायकाच्या स्वरूपाप्रमाणे असल्याचे अनेक साधकांना जाणवले.