पुणे येथे सनातन संस्थेच्या धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनास उदंड प्रतिसाद

श्री. किशोरभाऊ पोकळे यांना पंचांग भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील (उजवीकडे)

पुणे – सनातन संस्थेच्या चैतन्यदायी धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनास येथील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. १३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धर्मरथाच्या माध्यमातून सातारा रस्ता, पुणे शहर, सिंहगड रस्ता, हडपसर या ठिकाणी सनातन निर्मित ग्रंथ, वस्तू आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. स्थानिक मान्यवरांनी धर्मरथाचे पूजन केले आणि धर्मरथातून समाजाला होणार्‍या लाभाविषयी कौतुकही केले. समाजातूनही धर्मरथावरील प्रदर्शनाविषयी अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.

 

धर्मरथातील वस्तूंमुळे घरात प्रसन्नता येते !
– किशोरभाऊ पोकळे (पद्मावती मंदिराचे विश्‍वस्त, धायरीगाव)

१५ ऑक्टोबर या दिवशी धायरीगाव येथील पद्मावती मंदिराचे विश्‍वस्त श्री. किशोरभाऊ पोकळे यांच्या हस्ते धर्मरथाचे पूजन करण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘या प्रदर्शनाला मी प्रथमच भेट दिली. धर्मरथातील वस्तूंमुळे प्रसन्न वाटते. या वस्तू घरी नेल्या, तर घरातही प्रसन्नता येते. रथ बाहेरून पाहिला; पण आत आल्यावर मला एकदम सकारात्मक जाणवले. इथे बोलावून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडून तुम्ही पूजा करून घेतली आणि मला या रथाचा लाभ करून दिला, यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.’’

 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘आपली संस्कृती काय होती आणि आता आपण कोणत्या संस्कृतीत आलो आहोत, हे जेव्हा लोकांना कळेल, तेव्हा लोकांना हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्याची प्रचीती येईल’, असेही श्री. किशोभाऊ पोकळे यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment