रामनाथी (गोवा) – ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, पंचमहाभूतांच्या प्रकोपांपासून साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या आज्ञेने १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘पंचमहाभूत याग’ करण्यात आला. या यागाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी आणि पाठशाळेतील पुरोहित यांनी केले. प्रारंभी सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यागासाठी संकल्प केला. ५ कलशांवरील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या चांदीच्या प्रतिमांवर पंचमहाभूतांचे आवाहन अन् पूजन करण्यात आले. त्यानंतर पंचमहाभूतांसाठी हवन करण्यात आले. पूर्णाहुतीने यागाची सांगता झाली. या यागाला सनातन संस्थेचे संत, तसेच आश्रमातील साधक उपस्थित होते. प.पू. आबा उपाध्ये यांनी असे ३ याग करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार १८ ऑक्टोबर या दिवशी या शृंखलेतील शेवटचा याग करण्यात आला.
Home > सनातन वृत्तविशेष > रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या चैतन्यमय वातावरणात झाला पंचमहाभूत याग
रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या चैतन्यमय वातावरणात झाला पंचमहाभूत याग
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज अमृत महोत्सवी सन्मान सोहळा
- पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर...
- कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !
- धनत्रयोदशी निमित्त धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !
- शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
- माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन !