कलियुगामध्ये भगवंताचे नामस्मरण हाच खरा यज्ञ ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

उपस्थित वैद्य आणि आधुनिक वैद्य यांना मार्गदर्शन करतांना वैद्य संजय गांधी

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने येथील विठ्ठल मंदिर येथे मलकापूर शाहूवाडी वैद्यकीय संघटनेच्या वतीने श्री धन्वंतरी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ‘श्री धन्वंतरये नम:।’ या जपाचे सामूहिक पठण करण्यात आले, तसेच नंतर पूजा आणि आरती करण्यात आली.

 

कलियुगामध्ये भगवंताचे नामस्मरण हाच खरा यज्ञ ! – वैद्य संजय गांधी

या वेळी मनोगत व्यक्त करतांना सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी म्हणाले, ‘‘कलियुगामध्ये भगवंताचे नामस्मरण हाच खरा यज्ञ होय. सांप्रत काळ हा आपत्काळ असून प्रत्येकाने साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेरून साजरी होणारी दीपावली चिरकाल टिकणारी नसते, म्हणून अंतरीची दिवाळी साजरी करायची असेल, तर प्रत्येकाने स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. ज्यामुळे प्रत्येक जण सतत आनंदी राहू शकेल.’’

या वेळी वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष वैद्य प्रसाद कुलकर्णी, वैद्य मनोहर पाटील, वैद्य भरत पाटील, वैद्य अभिजीत यादव, वैद्य जे.बी. पाटील, वैद्य (सौ.) मोहिनी अंबिके, वैद्य (सौ.) अक्षता पाटील, वैद्य भूषण पाटील, वैद्य अमोल सोनटक्के, वैद्य गजानन पाटील, वैद्य नीलेश बसरे, ‘कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष भरतेश कळंत्रे, पॅथॉलॉजिस्ट सचिन पाटील, तसेच ओंकार अंबिके उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment