मुलुंड – सध्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात धर्माचे पालन केले जात नाही. त्यामुळे, तसेच राष्ट्रच धर्मनिरपेक्ष घोषित केले असल्यास धर्माला आलेली ग्लानी आपण अनुभवत आहोत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा धर्माची पुनर्स्थापना होते. धर्मसंस्थापनेची साधना करणे, ही काळानुसार साधना आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे श्री. मनीष माळी यांनी येथील मुलुंड सेवा संघाच्या सभागृहात सनातन संस्थेच्या वतीने पार पडलेल्या युवा साधना आणि कार्य परिचय शिबिरात केले. या वेळी सनातनच्या सद्गुुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगिता जाधव यांनी शिबिरार्थींंच्या साधनाविषयक प्रश्नांचे निरसन केले. शिबिरात ‘जीवनातील साधना आणि सत्सेवा यांचे महत्त्व’, ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची आवश्यकता’, ‘दैनिक सनातन प्रभात’, ‘सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी उपयोग कसा करावा ?’ यांविषयी मार्गदर्शन झाले. आध्यात्मिक उपायांचे महत्त्व सांगून ते करवून घेण्यात आले. भावप्रयोगाच्या माध्यमातून भगंवताला कसे अनुभवायचे, हेही शिकवण्यात आले. बहुतांश शिबिरार्थींना आध्यात्मिक उपाय, भावप्रयोग केल्यानंतर सकारात्मक ऊर्जा जाणवणे, उत्साह वाटणे, मरगळ दूर होणे आदी अनुभूती आल्या. शिबिरार्थींनी प्रारब्ध, जन्म-मृत्यूचा फेरा, पुनर्जन्म यांविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारून त्यांचे निरसन करून घेतले. सर्वांनी नियमितपणे साधना करण्याचा निर्धार केला.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > मुंबई जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना आणि कार्य परिचय शिबिर
मुंबई जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना आणि कार्य परिचय शिबिर
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !
- पुणे येथे नवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमांना देवी-भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
- नवरात्री निमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !
- शारदीय नवरात्री निमित्त पुणे आणि चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ यांचे...
- पितृपक्ष निमित्त कोची (केरळ) येथील दत्त मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !
- कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून झाला प्रसार !