रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्र-स्थापनेतील विविध अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांना विविध कारणांमुळे होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यांसाठी ११ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘गरूड पंचाक्षरी याग’ करण्यात आला. प्रारंभी यागासाठी संकल्प करण्यात आला. त्यानंतर महागणपति होम आणि नंतर मुख्य देवता गरूड यांच्यासाठी हवन करण्यात आले. यागाचे पौरोहित्य केरळ येथील पुरोहित श्री. मधुसूदन नंबुद्री आणि श्री. श्रीहरि नंबुद्री यांनी केले. या यागासाठी केरळ येथील धर्माभिमानी अधिवक्ता गोविंद भरतन् यांनी सहकार्य केले. या यागाच्या वेळी अधिवक्ता गोविंद भरतन् यांच्यासह आश्रमातील सनातन संस्थेचे संत आणि साधक उपस्थित होते.
क्षणचित्र
पुरोहितांनी यज्ञस्थळी केरळच्या पारंपरिक पद्धतीने रांगोळीने आध्यात्मिक यंत्रे आणि शुभचिन्हे काढली होती.