१. कर्नाटकमधील एका व्यावसायिकाने स्वतः अती मद्यपान करणे, तसेच
इतर ८ – १० जणांचा मद्याचा व्ययही स्वतः करणे, यामुळे त्यांच्या घरी वादविवाद होणे
‘कर्नाटकमधील एक व्यावसायिक पूर्वी पुष्कळ मद्यपान करत. ते स्वतःसमवेत ८ – १० जणांना मद्यालयात (‘बार’मध्ये) घेऊन जात आणि मद्यपान करत. या सर्वांच्या मद्याचा व्यय ते स्वतःच करत. अती मद्यपान करण्यामुळे त्यांचे हात थरथरत असत. त्यांचे हे वर्तन कुटुंबियांना आवडत नसल्यामुळे त्यांच्या घरी नेहमी वादविवाद होत असत.
२. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर दत्ताचा
नामजप, आध्यात्मिक उपाय, तसेच संतांचा सत्संग यांमुळे केवळ
१ मासातच व्यावसायिकांचे मद्यपानाचे व्यसन आश्चर्यकारकरित्या सुटणे
नंतर हे व्यावसायिक सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागले. त्यानंतर ते मद्यालयात जायचे; पण मद्यपान करण्याची इच्छा न झाल्याने ते मद्य न पिताच घरी परत यायचे. काही दिवसांनी त्यांना सनातन संस्थेचे संत पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) यांचा सत्संग लाभला. पू. अण्णांनी त्यांना प्रतिदिन ३ घंटे दत्ताचा नामजप आणि मिठाच्या पाण्याचे (मिठाच्या पाण्यात पाय ठेवून नामजप करणे) उपाय करण्यास सांगितले.
दुसर्या दिवशी नामजप करत असतांना त्या व्यावसायिकांना स्वतःचे पूर्वज दिसलेे. नंतर कारखान्यात जाऊन नामजप करत असतांना त्यांना सर्प (सूक्ष्मातून) दिसलेे. या सर्पांना मुख नव्हते. तेव्हा पू. अण्णांनी ‘नामजप करणे चालू ठेवा. सर्व ठीक होईल’, असे त्यांना सांगितले.
पू. अण्णांचे अध्यात्मिक मार्गदर्शन आणि प्रेमभाव, तसेच नामजप अन् आध्यात्मिक उपाय यांमुळे या व्यावसायिकांचे मद्यपानाचे व्यसन सुटले.
– सौ. शोभा कामत, उडुपी, कर्नाटक.
‘व्यसनांच्या आहारी गेलेले अनेक जण ‘व्यसनमुक्ती केंद्रा’त जाऊन व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. व्यसनमुक्त होण्यासाठी सहस्रो रुपये व्यय केले, तरी व्यसन सुटतेच असे नाही. याचे कारण म्हणजे व्यसन लागण्याच्या मागे आध्यात्मिक स्वरूपाचे त्रासही (उदा. पूर्वजांचा त्रास,वाईट शक्ती) असू शकतात.
या व्यावसायिकांना पूर्वजांचा तीव्र त्रास असल्यामुळे दत्ताच्या नामजपामुळे त्यांचा त्रास न्यून होऊ लागला आणि त्यांची मद्यपान करण्याची इच्छा न्यून होऊन केवळ १ मासातच त्यांचे अनेक वर्षांचे व्यसन सुटले. नामजपामुळे त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता वाढून त्यांना सूक्ष्मातील दृश्येही दिसू लागली. साधनेमुळे व्यक्तीला सूक्ष्म-जगताचे ज्ञान होऊ लागते. सर्वसाधारण व्यक्तीला अशक्यप्राय वाटणार्या अनेक गोष्टी साधनेमुळे सहज साध्य होतात. यावरून सध्याच्या कलियुगात साधनेला पर्याय नाही, हेच अधोरेखित होतेे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सध्याच्या कलियुगासाठी सांगितलेली साधना किती सर्वश्रेष्ठ आहे’, हेही यातून लक्षात येते.’ – संकलक