पुरातन काळापासून अनेक देवतांचे, तसेच द्वापरयुगातील पांडवांच्या हातांच्या आणि पावलांचे ठसे आजही भारतात अनेक ठिकाणी पहायला मिळतात, उदा. श्रीलंकेमध्ये हनुमानाच्या चरणांचे ठसे, शिरोळ (सांगली) येथे एका शिळेवर दत्तगुरूंच्या हाताचे ठसे, तसेच तमिळनाडूमध्ये कन्याकुमारीदेवीच्या चरणांचे ठसे. अशा प्रकारे १०.३.२०१८ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या सौरयागाच्या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा चरणांचे ठसे भूमीवर उमटल्यावर त्यांमध्ये विविध शुभचिन्हे दिसत होती.
१. देवतांच्या चरणांचे किंवा हातांचे ठसे
भूमीवर उमटण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा
देवतांच्या चरणांचे किंवा हातांचे ठसे भूमीवर एखाद्या ठराविक ठिकाणीच उमटल्याचे आपण पाहिले आहेत. हे ठसे ज्या ठिकाणी उमटतात, त्या ठिकाणी भूमीमध्ये दूरपर्यंत ती स्पंदने कार्यरत राहून अनेक युगांपर्यंत ती शक्ती तेथे कार्यरत राहते. सध्याच्या वाढत्या रज-तम प्रधानतेमुळे वातावरण दूषित होत चालले आहे. ठशांतून प्रक्षेपित होणार्या गतीमान तेजोलहरी वायूमंडलातील सूक्ष्मतर तेजरूपी रज-तमात्मक लहरींचे विघटन घडवून आणतात, तसेच ठशांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचे वायूमंडलात दीर्घकाळ अस्तित्व राहते. त्यामुळे पंचतत्त्वांच्या स्तरावर साधकांमध्ये आणि त्यांच्याभोवती कवच निर्माण होते.
२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांच्या
भूमीवर उमटलेल्या ठशांच्या विशिष्ट आकाराचे कार्य
अ. सौरयागातून कार्यरत झालेल्या ऊर्जेमुळे देहातून घामाच्या स्वरूपात आपतत्त्वात ऊर्जा बाहेर पडली आणि चरणांच्या भूमीवर उमटलेल्या ठशांच्या विशिष्ट आकारामुळे त्या ऊर्जेचे तेजतत्त्वाच्या स्तरावर घनीकरण होऊन सगुण-साकार रूप धारण झाले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांच्या भूमीवर उमटलेल्या ठशांतून निर्माण होणार्या तेजोलहरी वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींशी युद्धस्वरूपात लढून त्यांचे उच्चाटन करण्याचे कार्य करतात. त्यामुळे जिवाच्या देहाभोवतीच्या आवरणाचे विघटन होत असल्याचे जाणवले.
आ. ठशांतून निर्माण होणार्या तेजोलहरी इच्छा-क्रिया शक्तीशी संबंधित असतात. त्यामुळे दुसर्या दिवशी देवता त्या तेजोलहरी मारक-तारक तत्त्वाच्या स्तरावर भूमंडल आणि वायूमंडल यांमध्ये चैतन्य पसरवण्याचे कार्य करतात. या लहरी प्रकाशाच्या स्तरावर कार्यरत असतात. त्यामुळे जिवाला त्रास देणार्या मोठ्या वाईट शक्तींनी निर्माण केलेले बंध आणि स्थाने यांचे विघटन होते.
इ. ठशांतून निर्माण होणारे चैतन्य वायूमंडलात दीर्घकाळपर्यंत चैतन्य टिकवून ठेवण्याचे कार्य करते. त्यामुळे जिवाला आध्यात्मिक अनुभूती घेता येऊन त्याच्या उत्साहात वाढ होते.
३. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांच्या
भूमीवर उमटलेल्या ठशांमध्ये उमटलेल्या शुभचिन्हांचे कार्य
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांच्या भूमीवर उमटलेल्या ठशांत उमटलेल्या ‘ॐ’कारातून उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कार्य घडून येत असल्याचे जाणवले. समष्टीच्या संरक्षणासाठी तेजोमय कणांची उत्पत्ती करून आणि स्थितीस्वरूप तेजवलये कार्यकारी ठेवून लयदर्शक तेजलहरींच्या माध्यमातून त्रासदायक काळ्या शक्तींच्या निर्दालनाचे कार्य घडून येते. ‘स्वस्तिक’ आणि ‘ॐ’ या शुभ चिन्हांच्या माध्यमातून यज्ञ खर्या अर्थाने परिपूणर्र् अन् साकार झाल्याची देवाने दिलेली ही अनुभूती आहे.’