सनातन संस्थेने देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथे ऑगस्ट २०१९ मध्ये केलेला अध्यात्मप्रसार

 

१. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करण्यात आलेली प्रवचने

अ. ‘देहलीमध्ये १९.८.२०१९ या दिवशी मालवीय नगरमधील शिवमंदिरात सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती संगीता गुप्ता यांनी प्रवचन केले. प्रवचनानंतर रामनाम संकीर्तनही घेण्यात आले. मंदिरात ‘श्री राम जयराम जय जय राम ।’ हा नामजप चालू होता. तेव्हा सर्वांना शांतीची अनुभूती आली.

आ. १६.८.२०१९ या दिवशी देहलीतील सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती मंजुळा कपूर यांनी प्रवचन केले. त्यांनी उपस्थितांना भगवान श्रीकृष्णाविषयी माहिती देण्यासमवेतच ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजपही करवून घेतला.

इ. २३.८.२०१९ या दिवशी मथुरेच्या अशोका सिटी सोसायटीच्या मंदिरात प्रवचनाचे आयोजन केले होते. सनातन संस्थेच्या वतीने कु. स्वाती जग्गी यांनी ‘श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व, पूजा करण्याची पद्धत आणि उपासना’ यांविषयीची माहिती प्रवचनात दिली. त्यासह विविध माध्यमांद्वारे होणारे देेवतांचे विडंबन रोखण्यासाठी उपस्थित श्रद्धाळूंमध्ये जागृती केली. प्रवचनाचा समारोप भगवान श्रीकृष्णाच्या नामजपाने केला.

ई. २३.८.२०१९ या दिवशी हरियाणाच्या यमुनानगर येथील लाल बहादुर शास्त्री महिला आयुर्वेदीय महाविद्यालयाच्या मंंदिरात ‘भगवान श्रीकृष्णाची गुणवैशिष्ट्ये आणि विद्यार्थी जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर सनातन संस्थेचे साधक डॉ. भूपेश शर्मा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

२. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

२३.८.२०१९ या दिवशी वसंत कुंज येथील श्रीकृष्ण धाम मंदिरात, २४.८.२०१९ या दिवशी ‘ग्रेटर कैलाश २’ येथील सनातन धर्म मंदिरात आणि फरीदाबादमध्ये ३ ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.

– कु. मनीषा माहुर, देहली
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment