अनुक्रमणिका
१. मातेच्या आहाराचे गर्भावर होणारे परिणाम
१ अ. गर्भवतीने सात्त्विक आहार का घ्यावा ?
२. मातेने खाल्लेल्या निकृष्ट प्रतीच्या, म्हणजेच तामसिक अन्नामुळे गर्भाला होणारे क्लेष
२ अ. तामसिक अन्नामुळे गर्भाला अनेक क्लेष भोगावे लागणे
२ आ. तामसिक आहाराचे गर्भावर होणारे प्रत्यक्ष परिणाम
२ इ. आध्यात्मिक संस्कारांचे मूळ सात्त्विक आहारात दडलेले असणे आणि त्याचे महत्त्व
३. पहिल्या साडेतीन मासांतील आहार
सात्त्विक आहारातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होते. अशा प्रकारचा आहार गर्भवतीने घेतल्यास गर्भाची वाढ आध्यात्मिक स्तरावर होते. गर्भवतीने घेतलेल्या आहारामुळे गर्भावर कसे परिणाम होत असतात, त्याविषयी थोडक्यात पाहू.
१. मातेच्या आहाराचे गर्भावर होणारे परिणाम
मातेने खाल्लेल्या अन्नपाणी इत्यादींपासून गर्भाच्या शरिरातील सर्व धातू पुष्ट होऊ लागतात. याविषयी सांगण्यात येणार्या पुढील २ सूत्रांच्या (मुद्द्यांच्या) संदर्भात मिळालेले ज्ञान पाहूया.
अ. तो कृमीकीटकांचे उत्पत्तीस्थान असलेल्या निकृष्ट मल-मूत्राच्या खड्ड्यात पडून रहातो. तो कोमल असतो, म्हणून जेव्हा तेथील भूक लागलेले किडे त्याच्या अंगप्रत्यांगाला टोचू लागतात, तेव्हा अत्यंत क्लेश होऊन तो क्षणोक्षणी मूर्च्छित होतो.
आ. मातेने खाल्लेल्या कडवट, तिखट, उष्ण, खारट, सुके, आंबट इत्यादी उग्र पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या सर्व शरिराला पीडा होऊ लागते.
१ अ. गर्भवतीने सात्त्विक आहार का घ्यावा ?
१. शरिरातील धातू पुष्ट होणे
‘सात्त्विक आहाराचे महत्त्व वेळोवेळी हिंदु धर्मात सांगितले गेले आहे. सात्त्विक आहारातून शरिरातील धातू खर्या अर्थाने पुष्ट होऊ लागतात. पुष्टता म्हणजे सत्त्वगुणाच्या साहाय्याने प्राप्त झालेले बल.
२. सात्त्विक आहाराच्या संपर्कामुळे गर्भाची वाढ आध्यात्मिक स्तरावर होणे
सात्त्विक आहारातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होत असल्याने आणि सत्त्वगुण ब्रह्मांडातील चैतन्यशक्तीला आकृष्ट करण्यात अग्रेसर असल्याने अशा आहाराच्या संपर्काने गर्भाची वाढ आध्यात्मिक स्तरावर होऊ लागते.
३. तेजाच्या बलवर्धकतेमुळे गर्भवासातील सर्व पीडा दूर होण्यास साहाय्य मिळणे
चैतन्यशक्तीच्या स्पर्शाने गर्भाच्या सूक्ष्मदेहांतील तेजाचे बळ वाढू लागते. तेजाच्या बलवर्धकतेमुळे त्याच्या गर्भवासातील सर्व पीडा दूर होण्यास साहाय्य मिळून माता आणि गर्भ या दोहोंचेही शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक स्तरावरील स्वास्थ्य उत्तम रहाण्यास साहाय्य होते.
४. तेजाच्या संस्करणामुळे गर्भाभोवती संरक्षककवच निर्माण होणे
तेजाच्या संस्करणामुळे गर्भाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन बाह्य वायूमंडलातून होणार्या वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून, तसेच अनेक त्रासदायक स्पंदनांच्या आघातांपासून त्याचे रक्षण होण्यास साहाय्य मिळते.
२. मातेने खाल्लेल्या निकृष्ट प्रतीच्या
म्हणजेच तामसिक अन्नामुळे गर्भाला होणारे क्लेष
२ अ. तामसिक अन्नामुळे गर्भाला अनेक क्लेष भोगावे लागणे
मातेने खाल्लेल्या अन्नातील अर्क गर्भाला मिळत असतो. मातेचा आहार निकृष्ट प्रतीचा, म्हणजेच तामसिक असेल, तर गर्भाला अनेक पीडा आणि क्लेष भोगावे लागतात.
१. पीडा आणि क्लेष
पीडा म्हणजेच जिवाला होतात त्या वेदना, तर क्लेष म्हणजे जीवात्म्याला भोगाव्या लागणार्या यातना.
२. वेदना आणि यातना
वेदना स्थूलदेहाला होतात, तर यातनांचे क्लेष मनोदेह, तसेच सूक्ष्मदेह यांपर्यंत पोहोचलेले असतात.
३. गर्भाचा नरकवास
गर्भवासालाच ‘नरकवास’ ही उपमा दिली जाते. मातेच्या उदरात असतांना गर्भ तिने खाल्लेल्या अन्नातून निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या वासनात्मक तरंगांना बळी पडत असतो. या तरंगांचे अनिष्ट असे सूक्ष्म परिणाम त्याचा मनोदेह, तसेच सूक्ष्मदेह यांवर होत असतात.
२ आ. तामसिक आहाराचे गर्भावर होणारे प्रत्यक्ष परिणाम
१. मातेच्या तामसिक आहारामुळे गर्भात तमोगुणी लहरींचे संकरण होऊन तो वाईट शक्तींच्या त्रासाला बळी पडू शकणे
तामसिक आहार, म्हणजेच तिखट, तेलकट; तर रजोगुणी आहार, म्हणजेच आंबट, खारट आणि तुरट आहार. अशा प्रकारच्या चवीचे अन्न मातेच्या आहारात असेल, तर गर्भावर त्याचा विपरीत परिणाम होऊन त्याच्या देहात तमोगुणी लहरींचे संकरण होऊ लागते आणि गर्भ हळूहळू वाईट शक्तींच्या त्रासाला बळी पडू शकतो.
२. गर्भवासातील त्रास दूर करण्यासाठी जन्मोजन्म लागू शकणे
गर्भात असतांनाच त्यालाआध्यात्मिक त्रास चालू होऊ शकतात. हे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी पुढे जन्मोजन्मही लागू शकतात.
३. तामसिक अन्नातील तमोगुणी रस गर्भाच्या देहाच्या पोकळीत शिरल्याने तो क्षणोक्षणी मूर्च्छित होणे
तामसिक अन्नातील तमोगुणी रस गर्भाच्या देहाच्या पोकळीत शिरल्याने त्यातून निर्माण झालेल्या उत्सर्जनात्मक द्रवजन्य, तसेच वायूजन्य पदार्थांमध्ये अनेक सूक्ष्म त्रासदायक जंतूंची निर्मिती झाल्याने यांच्यापासून निर्माण होणार्या पीडा आणि क्लेष शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक स्तरावर भोगत असतांना तो गर्भ क्षणोक्षणी मूर्च्छित होऊ शकतो, यातनांनी काही न कळण्याच्या स्थितीत जाऊ शकतो, म्हणजेच या अवधीत तो पूर्णतः जंतूरूपी वाईट शक्तींच्या नियंत्रणात असू शकतो. अशा प्रकारे सातत्याने उत्पन्न होणार्या आध्यात्मिक पीडा, गर्भवासातच त्याच्या जीवनाचा र्हास करू शकतात.
४. कालांतराने माता आणि गर्भ हे दोघेही त्रासदायक स्पंदनांच्या विळख्याला बळी पडू शकणे
कालांतराने त्याच्या देहातच, परिणामी मातेच्या देहातही वाईट शक्तीचे स्थान मूळ धरू शकतात. यामुळे माता आणि गर्भ या दोहोंनाही त्रासदायक स्पंदनांच्या विळख्याला बळी पडावे लागण्याची शक्यता असते.
५. तमोगुणी संपर्कातून त्रास वाढणे
मातेच्या देहाच्या पोकळीत साठलेल्या मल-मूत्रादी विसर्जनात्मक पदार्थांच्या तमोगुणी संपर्कातूनही हा त्रास वाढू शकतो.
६. रज-तमात्मक आहारातील त्रासदायक स्पंदनांमुळे गर्भाच्या शरिराला पीडा होण्याचे कारण
रज-तमात्मक आहारातील त्रासदायक स्पंदने सूक्ष्म कर्कश ध्वनीची, तसेच सूक्ष्म आघातांची निर्मिती करणारी असल्याने अशा पदार्थांच्या स्पर्शाने ‘गर्भाच्या सर्व शरिराला पीडा होऊ शकते’, असे म्हटले जाते.
२ इ. आध्यात्मिक संस्कारांचे मूळ सात्त्विक आहारात दडलेले असणे आणि त्याचे महत्त्व
‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार, तसे कर्म’, असे म्हटले जाते. कर्म जर उत्तम असेल, तरच जिवाची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते; म्हणून आध्यात्मिक संस्कारांचे मूळही सात्त्विक आहारात दडलेले आहे, हे लक्षात येते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, श्रावण शुद्ध २, कलियुग वर्ष ५१११ २२.७.२००९, सकाळी ५.५३)
३. पहिल्या साडेतीन मासांतील आहार
अ. गर्भवतीला वातुळ पदार्थ देऊ नयेत; कारण त्यामुळे गर्भाच्या मेंदूवर परिणाम होतो.
आ. वायू हे अधोगामी आणि उर्ध्वगामी असे दोन्ही असतात. त्यामुळे तिच्या, तसेच अर्भकाच्याही श्वसनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.’ – स्वामी विद्यानंद, मुंबई (वर्ष १९८७)
इ. खाल्लेल्या अन्नाप्रमाणे संतती होते !
एक सुभाषित आहे –
दीपो भक्षयते ध्वान्तं कज्जलं च प्रसूयते ।
यद् अन्नं भक्षयेत् नित्यं जायते तादृशी प्रजा ।।
अर्थ : दिवा काळोख खातो (म्हणजे नष्ट करतो) आणि काजळी निर्माण करतो. (त्याप्रमाणे आपण) नेहमी जे अन्न खातो, तशी संतती होते. उत्तम संतती होण्यासाठी माता-पिता यांनी सात्त्विक आहार घेतला पाहिजे.