दत्ताची उपासना

 

दत्त Datta

दत्त

 

दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृतींविषयी साक्षात ईश्वराकडून मिळालेले ज्ञान

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळेच त्या देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यास साहय्य होते. दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत नेहमीच्या काही कृती नेमक्या कशा कराव्यात, याविषयी सनातनच्या साधकांना साक्षात ईश्वराकडून मिळालेले ज्ञान पुढे सारणीत दिले आहे. या आणि यांसारख्या विविध कृतींमागील शास्त्र सनातन-निर्मित ग्रंथमालिका ‘धर्मशास्त्र असे का सांगते ?’ यात दिले आहे.

 

उपासनेची कृती

कृतीविषयी ईश्वराकडून मिळालेले ज्ञान

१. दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला गंध कसे लावावे ? अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे.
२. दत्ताला गंध कोणत्या बोटाने लावावे ? अनामिकेने
३. फुले वहाणे

अ. फुले कोणती वहावीत ?

आ. संख्या किती असावी ?

इ. फुले वहाण्याची पद्धत कोणती ?

ई. फुले कशा आकारात वहावीत ?

जाई आणि निशिगंध

सात किंवा सातच्या पटीत

फुलांचे देठ देवाकडे करून ती वहावीत.

पोकळ शंकरपाळ्याच्या आकारात

४. उदबत्तीने ओवाळणे

अ. तारक उपासनेसाठी कोणत्या गंधाची उदबत्ती ?

आ. मारक उपासनेसाठी कोणत्या गंधाची उदबत्ती ?

इ. संख्या किती असावी ?

ई. ओवाळण्याची पद्धत कशी असावी ?

चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर

हीना

दोन

उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यांत धरून घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळावे.

५. अत्तर कोणत्या गंधाचे अर्पण करावे ? वाळा

 

दत्ताच्या उपासनेतील सुलभता

आपल्या भावानुसार देवतांनी सगुणात येऊन कार्य करणे अवलंबून असते. दत्त हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत असल्याने इतर देवतांच्या तुलनेत तो कमी कालावधीत सगुणात येऊन कार्य करतो; म्हणून इतर देवतांच्या तुलनेत दत्ताची उपासना सुलभ आहे.

 

दत्ताच्या उपासनेतील काठिण्य

प्रत्येक देवतेच्या साधनेतील काठिण्य हे आपण साधना केल्यावर त्या देवतेची सूक्ष्म-ज्ञानेंद्रिये आणि सूक्ष्म-कर्मेंद्रिये लवकर अथवा उशिरा जागृत होण्यावर अवलंबून असते. याबाबतीतील फरक १० टक्के इतका असतो. दत्ताच्या उपासनेतील काठिण्य ७ टक्के आहे. – ब्रह्मर्षि (श्री. राम होनप यांच्या माध्यमातून)

 

दत्ताला करावयाच्या काही प्रार्थना

१. हे दत्तात्रेया, तू जसे चोवीस गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.
२. हे दत्तात्रेया, भुवलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे.
३. हे दत्तात्रेया, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून तू माझे रक्षण कर. तुझे संरक्षक-कवच माझ्याभोवती सदोदित असू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.

 दत्तगुरूंची काळानुसार आवश्यक उपासना !

१. दत्ताच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण देणे

बहुतांश हिंदूंना आपल्या देवता, आचार, संस्कार, सण आदींविषयी आदर आणि श्रद्धा असते; परंतु त्यांच्या उपासनेमागील धर्मशास्त्र ठाऊक नसते. शास्त्र समजून घेऊन धर्माचरण योग्यरित्या केल्यास अधिक फलप्राप्ती मिळते. त्यामुळे दत्ताच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही दत्तभक्तांसाठी काळानुसार आवश्यक अशी श्रेष्ठ स्तराची समष्टी साधना आहे.

२. दत्त मंदिरात पावित्र्य राखावे !

अ. दत्ताच्या किंवा अन्य मंदिरात दर्शनासाठी झुंबड करू नये. ओळीने अन् शांतपणे दर्शन घ्यावे. शांतपणे भावपूर्ण दर्शन घेतल्यानेच दर्शनाचा खरा लाभ होतो.

आ. देवळात किंवा गाभार्‍यात गोंगाट करू नये. गोंगाट केल्यामुळे देवळातील सात्त्विकता घटते, तसेच तेथे दर्शन घेणार्‍या, नामजप करणार्‍या किंवा ध्यानाला बसलेल्या भाविकांनाही त्याचा त्रास होतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दत्त’

4 thoughts on “दत्ताची उपासना”

  1. श्री दत्त स्वामी महाराजंची पुष्पांजली व श्री गुरू दत्त राज मुर्ती ओवाळितो प्रेमे अरती ही आरती व अन्य सर्व प्रार्थना लिखीत स्वरूपात व कर्णपट्टीकेसह(आॅडिओ क्लिप) पाठवावी ही विनंती

    Reply
    • नमस्कार,

      सध्या आमच्याकडे तुम्ही उल्लेख केलेली स्तोत्रे व आरती नाही. दत्ताची आरती, श्लोक, नामजप सनातनच्या चैतन्यवाणी ऑडिओ ॲप वर लिखित व ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. त्यावर तुम्ही ते ऐकू शकता. हे ॲप आजच डाऊनलोड करा – https://play.google.com/store/apps/details?id=sanatan.audios.musicplayer

      Reply
  2. ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
    श्री दत्त जयंतीनिमित्त समग्र माहितीपूर्ण लेख वाचून आनंद झाला.
    ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

    Reply

Leave a Comment