वर्धा येथे सनातन संस्थेच्या वतीने साधनावृद्धी शिबिर
वर्धा – नामजप केल्याने आपल्यामध्ये पालट होतो. देव आपल्याला अनुभूती देतो. नामजप हा साधनेचा मूळ पाया आहे; म्हणून प्रतिदिन २ घंटे नामजप करायलाच हवा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी येथे आयोजित साधना शिबिरात केले. या शिबिराला सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक आदी उपस्थित होते. सनातन संस्थेच्या वतीने २२ सप्टेंबर या दिवशी साधनावृद्धी शिबिर पार पडले. या वेळी पू. अशोक पात्रीकर यांनी ‘स्वभावदोष निर्मूलन आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया कशी राबवायला हवी ? याविषयीही मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या सौ. मंदाकिनी डगवार यांनी ‘आपले मन कसे कार्य करत असते ?’ यावर मार्गदर्शन केले. शिबिरार्थींनी शेवटपर्यंत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. ‘स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया’ याविषयीची माहिती सर्वांना आवडली. सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांनाही उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.