
ब्रह्मपूर – सनातन संस्थेच्या वतीने शिवाजीनगर, लालबाग आणि शिकारपुरा येथे साधना विषयावर प्रवचन घेण्यात आले. लालबाग येथे दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. सुरेश गावडे यांच्या घरी, तर शिकारपुरा येथील श्री दुर्गा मंदिरात हे प्रवचन घेण्यात आले. लालबाग येथे सौ. विमल कदवाने यांनी, तर शिकारपुरा येथे सौ. रंजना दाणेज यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. लालबाग येथील प्रवचनाचा अनेक महिला जिज्ञासूंनी लाभ घेतला, तर शिकारपुरा येथील प्रवचनालाही अनेक महिला आणि मुले उपस्थित होती.