श्री रेणुकादेवी
देवीच्या विविध रूपांची ‘कुलदेवी’ म्हणून उपासना केली जाते. त्यांतील श्री रेणुकादेवी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत. तत्पूर्वी पाहूया, श्री रेणुकादेवीची थोडक्यात माहिती.
रेणुकादेवीची निर्मिती
स्कंदपुराणातील सह्याद्रीखंडानुसार शिवाचा वर मिळवून श्री रेणुकादेवी पृथ्वीवर उतरली आणि कन्याकुब्ज देशाचा ईक्ष्वाकुवंशीय राजा ‘रेणू’ याने केलेल्या यज्ञातून ती प्रकटली, यामुळे तिला ‘रेणुका’ असे नाव पडले आहे. श्री रेणुकादेवी ही जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान परशुरामांची आई होय. तिचे स्थान महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामधील माहूर या गडावर आहे. माहूर हे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असून ते शक्तीचे मूळपीठ मानले जाते. या ठिकाणी देवीचा तांदळा आहे. तांदळा म्हणजे मुखवटा.
देवीचा ‘तांबूल प्रसाद’ !
श्री रेणुकादेवीला नैवेद्य म्हणून विड्याची पाने, चुना, काथ, ओवा, बडीशेप, लवंग, वेलदोडा, खोवलेले किंवा किसलेले खोबरे आणि सुपारी हे सर्व एकत्र कुटून भरवण्याची पद्धत आहे. त्याला ‘तांबूल’ असे म्हणतात. अभिषेक, पूजा इत्यादी झाल्यावर हा ‘तांबूल प्रसाद’ भक्तांना दिला जातो.
देवीचा तारक नामजप कसा करावा ?
‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ हा नामजप देवीच्या तारक तत्त्वाशी संबंधित आहे, त्यामुळे ‘रेणुका’ या शब्दातील ‘का’ हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे, यामुळे भावजागृती लवकर होण्यास साहाय्य होते.
आता आपण ऐकूया, श्री रेणुकादेवीचा नामजप …….
सनातन-निर्मित सात्त्विक नामपट्टी
देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीची सविस्तर माहिती ‘नाम’ या लिंकवर उपलब्ध आहे.
नामजप ऐकून छान वाटलं, माहिती छान असते