केपे – सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, असे उद्गार बेतुल, केपे येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर यांनी काढले. श्री. दत्ता जुवेकर हे गेली ६ दशके श्री गणेशमूर्ती करण्याची सेवा करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी संवाद साधतांना मूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर यांनी हे उद्गार काढले. मूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर पुढे म्हणाले, ‘‘मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून श्री गणेशमूर्ती बनवण्याची सेवा करत आहे. श्री गणेशमूर्ती या चिकण मातीपासूनच बनवणे आवश्यक आहे. मूर्तीपूजनाच्या वेळी चिकणमातीच्या मूर्तींमध्ये देवतेचे तत्त्व मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असते. मूर्ती चिकण मातीपासून बनवल्याने ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळते. यामुळे मूर्तीतील गणेशतत्त्व वातावरणात पसरते आणि त्याचा सर्वांनाच लाभ होत असतो. यामुळे मी आणि माझ्यानंतर आता माझी मुलेही चिकण मातीपासूनच गणेशमूर्ती बनवतात. आम्ही प्रत्येक वर्षी सुमारे २५० श्री गणेशमूर्ती बनवतो. आर्थिक लाभासाठी प्लास्टर ऑफ परिस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या मूर्ती बनवून त्याची विक्री करण्यास माझा विरोध आहे.’’
Home > आमच्याविषयी > अभिप्राय > प्रतिष्ठितांची मते > सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त ! – दत्ता जुवेकर, गणेशमूर्तीकार, गोवा
सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त ! – दत्ता जुवेकर, गणेशमूर्तीकार, गोवा
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ सनातन संस्थाच करू शकते ! – श्री. अनिल धीर
- पुढील १०० वर्षे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळावे, ही प्रार्थना ! –...
- सुप्रसिद्ध संवादिनीवादक सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांची सनातनच्या आश्रमाला...
- सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कु. मुग्धा वैशंपायन यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !
- सनातन संस्थेच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर परत निघायची इच्छा होत नाही ! – जगजीतन पांडे, महामंत्री,...
- भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट