बेळगाव – दैवेज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघ यांनी शाहपूर, बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात आले. या उपक्रमात डॉ. राजकुमार देसाई, डॉ. ज्योती दाभोलकर, डॉ. नम्रता कुत्रे आणि कु. गौरी कारेकर यांनी सहभाग घेतला.