
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – वाराणसीस्थित संन्याशी स्वामी निर्मलानंद गिरी यांची मलकापूर येथील महादेव टेकडी येथे असणार्या शिव मंदिरामध्ये सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले. महाराज श्रावण मासामध्ये महादेव टेकडीवर पारायणासाठी आले आहेत. त्यांची भेट घेतल्यावर सनातन प्रभातच्या अंकाविषयी महाराजांनी आस्थेने चौकशी केली, तसेच सनातन प्रभातमधील विषय माझ्या प्रवचनात मांडेन, असे त्यांनी सांगितले.