
बेळगाव – येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. राजू उमराणी, डॉ. (सौ.) मीना पाटील आणि डॉ. (सौ.) नम्रता कुट्रे यांनी तपासणी करून उपस्थितांना औषधे दिली. या वेळी तपासणीसाठी साहाय्यक म्हणून डॉ. (सौ.) ज्योती दाभोळकर, सौ. नम्रता कंग्राळकर आणि सौ. अश्विनी चौगुले उपस्थित होत्या. या शिबिराचा लाभ ९८ जणांनी घेतला.