बेळगाव – येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया अन् मलेरिया या रोगांवरील प्रतिबंधक ‘होमियोपॅथी’ची औषध देण्यात आले. नुकताच बेळगाव येथे महापूर येऊन गेला. यानंतर पाणी ओसरल्यावर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे, साथीचे आजार पसरू अथवा बळावू नयेत म्हणून हे औषध देण्यात आले. हे औषध डॉ. राजकुवर देसाई आणि डॉ. (सौ.) ज्योती दाभोळकर यांनी दिले. हे औषध भारत होमिओ फार्मसी यांनी प्रायोजित केले होते. याचा लाभ ८० हून अधिक नागरिकांनी घेतला.
या वेळी डॉ. (सौ.) नम्रता कुट्रे यांनी ‘आगामी आपत्काळात प्रथमोपचाराचे महत्त्व’ उपस्थितांना सांगून आयोजित करत असलेल्या विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.