महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत महापुरामुळे उद्भवलेली भीषण स्थिती !

लोकहो, भीषण आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणा आणि साधना वाढवून ईश्‍वराची कृपा संपादन करा ! 

 

१. महाराष्ट्रातील दुःस्थिती !

सांगलीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचे एक दृश्य

१ अ. पूरग्रस्तांची दुर्दशा !

१. महापुरात महाराष्ट्र राज्यातील ५० हून अधिक लोक मृत्यूमुखी !

२. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर आदी १० जिल्ह्यांतील ७० तालुक्यांतील ७८१ गावांना पुराचा फटका !

३. १० जिल्ह्यांतील ४ लाख ४८ सहस्र नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ सहस्र, तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ सहस्र नागरिकांचा समावेश !

४. पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरती निवाराकेंद्रे !

५. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह सैन्यदल, नौदल, कोस्ट गार्ड यांची एकूण १०५ पथके कार्यरत ! कोल्हापूर जिल्ह्यात ५४ आणि सांगली जिल्ह्यात ५१ पथके कार्यरत !

(संदर्भ : दैनिक सकाळ, १२.८.२०१९)

१ आ. शेतीची मोठी हानी !

अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे महाराष्ट्र राज्यातील १३ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमधील २ लाख १४ सहस्र ९६.१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये भात, आंबा, भाजीपाला, चिकू, केळी, वरई, कापूस, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, मका, बाजरी, तूर, हळद, भुईमूग अशा विविध पिकांची हानी झाली आहे. रायगडमधील २, ठाण्यातील ३, सिंधुदुर्गमधील ८, पालघरमधील ७, धुळ्यातील ३, नाशिकमधील ११, सातार्‍यातील ९, सांगलीतील ४, कोल्हापुरातील १२, पुण्यातील ८, सोलापुरातील ६, नगर १ आणि वर्ध्यातील ३ तालुक्यांचा समावेश आहे.

– जयदत्त क्षीरसागर, फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री
(दैनिक लोकसत्ता, १०.८.२०१९)

१ इ. कोल्हापूर जिल्ह्यातील पशूधनाची हानी !

जिल्ह्यातील ५ सहस्र प्राण्यांना या पुराचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती पशूवैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे. १०० लहान-मोठ्या प्राण्यांचा, तर ५ सहस्र कोंबड्यांचा या महापुरात मृत्यू झाला असून ४ सहस्र प्राण्यांची निवाराकेंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

 

२. कर्नाटकातील दुःस्थिती !

अ. १० सहस्र कोटी रुपयांची हानी !

आ. ४ लाख ८१ सहस्र नागरिक विस्थापित !

इ. २२ सहस्र ४३१ घरे पडली !

(संदर्भ : दैनिक पुढारी, १२.८.२०१९)

वर दिलेल्या आकडेवारीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. यातील मनुष्यहानी ही भरून न निघणारी आहे ! नागरिकांनी उभे केलेले संसारच्या संसार या महापुरात वाहून गेले आहेत. ते उभे करून जीवन पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांना पुढील ५-१० वर्षे खर्ची घालावी लागतील. यावरून आपत्काळाची भीषणता आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment