श्रीकृष्ण
भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी देवतेच्या नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने श्रीकृष्णाचा नामजप कसा करावा, हे येथे ऐकूया.
सात्त्विक नामपट्टी
‘वासुदेव’ या शब्दाचा अर्थ
सर्वप्रथम आपण ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामजपातील ‘वासुदेव’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ‘वासुदेव’ हे श्रीकृष्णाचे एक नाव आहे. ‘वासु’ आणि ‘देव’ या दोन शब्दांनी हा शब्द बनलेला आहे. ‘वासः’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे स्थिती. जीवसृष्टीला विशिष्ट स्थिती प्राप्त व्हावी; म्हणून ज्या लहरी आवश्यक असतात, त्या देणारा देव म्हणजे वासुदेव, म्हणजेच श्रीकृष्ण, असा त्याचा अर्थ आहे.
तारक भावाचा नामजप करणे
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करतांना जपामध्ये तारक भाव येण्यासाठी प्रत्येक शब्दाचा उच्चार दीर्घ करावा. कोणत्याही शब्दावर जोर देऊ नये. प्रत्येक शब्दाचा उच्चार कोमल असावा. आता या तत्त्वानुसार आपणही नामजप करण्याचा प्रयत्न करूया.
देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीची सविस्तर माहितीसाठी येथे पहा ! देवतेच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपाचे महत्त्व
श्रीकृष्णतत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्या !
येथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा कृष्णजन्माष्टमीला, म्हणजेच श्रावण कृष्ण अष्टमीला श्रीकृष्णाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते; म्हणून या तिथीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप अधिकाधिक करावा आणि श्रीकृष्णतत्त्वाचा लाभ करून घ्यावा.
Its really good. Please keep up this divine work.