सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (वार्ता.) – किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे प.पू. देवबाबा यांनी २३ जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली. पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये आश्रमात असतांनाच प्रीतीस्वरूप प.पू. देवबाबा यांचेही आश्रमात आगमन झाल्यामुळे सर्व साधकांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. या वेळी सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच प.पू. देवबाबा यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या शिष्या कु. प्रसन्नालक्ष्मी यांचा सत्कार सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. या वेळी संत प.पू. आबा उपाध्ये आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
Home > आमच्याविषयी > अभिप्राय > आश्रमाविषयी > संतांचे आशीर्वाद > किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट
किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी यांची सनातन आश्रम, रामनाथी येथे सदिच्छा भेट
- पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
- हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता ! – पू. कृष्णात डोणे महाराज...
- शीख परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
- श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या...
- सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे ! – श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी