लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेच्या वतीने येथील इंदिरानगर मानस सिटीमध्ये नुकतेच ‘साधना’ विषयावर व्याख्यान घेण्यात आले. पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘नामजपाचे महत्त्व’, ‘कलियुगामध्ये कुठला नामजप करणे उपयुक्त आहे’ यांविषयी माहिती सांगितली.
श्री हनुमान आणि श्री पंचमुखी वीर हनुमान यांच्या विषयी त्यांनी शास्त्रीय माहिती सांगितली.
‘सध्या हिंदूंच्या देवतांचा वारंवार अवमान केला जातो, त्यांची विटंबना केली जाते. हिंदु धर्म आणि हिंदूंच्या देवता यांचे होणारे विडंबन थांबवण्यासाठी आपण कसे प्रयत्न करू शकतो’, याविषयी पू. नीलेश सिंगबाळ यांनी सर्वांना अवगत केले. पू. सिंगबाळ यांनी जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी सत्संग चालू करण्याची मागणी केली.