
जळगाव – येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा ३० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
नामस्मरण कोणते करावे ?, कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व काय ? दानाचे महत्त्व, स्वभावदोष घालवून आनंदप्राप्ती कशी करावी ? आदी विषयांवर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.