मिरज – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील भारतभूषण प्राथमिक विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन झाले. यात गुरु-शिष्य परंपरा, शिष्याचे गुण, तसेच अन्य माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. याचा लाभ इयत्ता ४ थी ते ७ वी मधील २०० विद्यार्थी अन् १२ शिक्षक यांनी घेतला.