परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातील निर्गुण तत्त्वामुळे त्यांच्या उशीच्या अभ्य्रावर ‘ॐ’ उमटणे म्हणजे ‘ॐ’काराच्या माध्यमातून सगुण साकार झालेले नादब्रह्म !

‘नादब्रह्मस्वरूप, अनादि आणि अनंत परमेश्‍वराचे सगुण-साकार रूप म्हणजे ‘ॐ’कार ! अशा या परमेश्‍वराच्या सगुण-साकार रूपाच्या संदर्भात संत ज्ञानेश्‍वर माऊली म्हणतात,

अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ।
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥

– ज्ञानेश्‍वरी, अध्याय १, ओवी १९ आणि २०

अर्थ : ज्या वेळी ‘अ’कार, ‘उ’कार आणि ‘म’कार हे एकत्र झाले, त्या वेळी त्यात शब्दब्रह्माचा समावेश होऊन ‘ॐ’कार हे रूप बनले. त्या आदिबिजाला मी श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने नमस्कार करतो.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नेहमीच्या वापरातील उशीच्या
अभ्य्रावर दोन ठिकाणी ‘ॐ’ उमटणे आणि त्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

८.७.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नियमित वापरातील उशीच्या अभ्य्रावर दोन ठिकाणी ‘ॐ’ उमटल्याचे दिसले. त्यांच्या उशीच्या अभ्य्रावर ‘ॐ’ उमटण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा पुढीलप्रमाणे आहे.

अ. देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने निर्गुण तत्त्वाच्या साहाय्याने साकारत्व प्रगट होते; म्हणून ‘ॐ’कारधारणेतून कार्य करणारे जीव ‘उन्नत’ असतात. यातून परात्पर गुरु डॉक्टर हे ‘उन्नत योगी’ असल्याचे सिद्ध होते.

आ. उशीच्या अभ्य्रावर उमटलेला ‘ॐ’चा आकार सगुण क्रियाशक्तीच्या स्तरावरील आहे. त्यामुळे कार्याला चेतना मिळण्यास साहाय्य करण्यासाठी ‘ॐ’काराच्या माध्यमातून सगुण साकारत्व धारण झाले. ही प्रक्रिया शक्तीच्या स्तरावर, म्हणजेच अधिकतर सगुणदर्शक कार्यकारी असते. त्यामुळे स्थळाच्या भाषेत कार्य करण्याची व्याप्ती अधिक असते.

इ. उशीच्या अभ्य्रावर उमटलेल्या ‘ॐ’ला प्राप्त होणार्‍या विशिष्ट आकारामुळे ईश्‍वराच्या निर्गुण स्वरूपाचे घनीकरण होऊन तो सगुण-साकार होतो, म्हणजेच आकार धारण करतो. ईश्‍वराच्या आकारधारणेतून दृश्यमानता प्राप्त होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उशीच्या अभ्य्रावर उमटलेल्या ‘ॐ’मधून निर्गुण चैतन्याच्या लहरींचे प्रक्षेपण होऊन खोलीतील निर्गुण तत्त्वाच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे जाणवते. स्थूलदेहातून सगुण स्तरावरील ईश्‍वरी तत्त्वाचे निर्गुण स्तरात रूपांतर होते आणि ते निर्गुण तत्त्व ऊर्जेच्या स्वरूपात वातावरणात स्थित होते. अशाप्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातील निर्गुण तत्त्वामुळे त्यांच्या उशीच्या अभ्य्रावर सगुणातून ‘ॐ’ उमटले.

 

‘ॐ’काराचे दर्शन म्हणजे देवाने परिपूर्णत्वाची दिलेली पावतीच !

साधनेमुळे जिवाची सात्त्विकता वाढू लागते. साधना जशी वृद्धिंगत होत जाते, तसे स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्मातील कळू लागते. ‘केवळ डोळ्यांनी दिसते, तेच सत्य’, असे न मानता एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून पाहिल्यास तिच्यातील चांगली आणि त्रासदायक स्पंदने जाणवतात, दिसतात किंवा त्या संदर्भात अनुभूती येते. ‘ॐ’कार हा सर्वव्यापक आणि स्वस्वरूप असल्यामुळे परिपूर्ण असतो, तसेच तो पूर्णत्व प्राप्त करून देणारा आहे. ‘ॐ’कार दिसणे, ही देवाने परिपूर्णत्वाची दिलेली पावतीच आहे.’

– कु. प्रियांका विजय लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

 

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अनेक बुद्धीअगम्य घटना घडत आहेत. आश्रमात वास्तव्य करणारे संत आणि उच्च आध्यात्मिक पातळी असणारे साधक यांच्या देहावर, आश्रमातील फळभाज्या अन् खाद्यपदार्थ यांवर, तसेच आश्रमातील लाद्यांवर ‘ॐ’ उमटले आहेत. आश्रमामध्ये करण्यात आलेल्या यज्ञांतून निर्माण झालेल्या ज्वाळांमध्ये ‘ॐ’ उमटल्याचे लक्षात आले. तसेच भारतातील विविध राज्यांत असलेले सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र, तसेच साधकांची घरे याठिकाणी ‘ॐ’ उमटल्याचे लक्षात आले. ‘अशा प्रकारे विविध ठिकाणी ‘ॐ’ आणि अन्य शुभचिन्हे (स्वस्तिक, कमळ इत्यादी) उमटण्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे ? त्याचा परिणाम किती अंतरापर्यंत असतो ? त्याचा व्यक्तीचा देह, मन आणि बुद्धी यांवर काय परिणाम होतो ? काही ठराविक ठिकाणी ही चिन्हे उमटण्यामागील कारण काय ? त्याचे कोणत्या यंत्रांच्या साहाय्याने संशोधन करावे ?’ या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, इ-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment