शिष्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी तेजाने घालवणार्या श्रीगुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! शिष्याचे अज्ञान घालवून त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी जे शिष्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूतीही देतात, त्यांना ‘गुरु’ म्हणतात. अशा कृपावत्सल गुरुंनी म्हणजेच प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः वास्तव्य केलेल्या मध्यप्रदेशमधील मोरटक्का आणि इंदूर येथील आश्रमांतील चैतन्यदायी वास्तूचे छायाचित्रात्मक दर्शन घेऊया.
भक्तवात्सल्याश्रम, इंदूर येथील प.पू. भक्तराज महाराज यांची चैतन्यदायी खोली ! येथेच प.पू. रामानंद महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. बाबांची सेवा केली.
मोरटक्का, मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांच्या ‘श्री सद्गुरु सेवासदन’ या आश्रमात प.पू. भक्तराज महाराज हे जिथे बसायचे ते स्थान !
[