
नागाव (जिल्हा कोल्हापूर) – शरिराला बंधने असतात; पण मनाला नाही. माणसाचे मन चंचल आहे. या मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप केला पाहिजे. सध्याच्या काळानुसार कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप प्रत्येकाला आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या ४ जुलै या दिवशी नागाव येथे साधना शिबिरात बोलत होत्या. आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी ३४ धर्मप्रेमी महिला उपस्थित होत्या.