पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तथा ‘ग्रहांकित’ मासिकाचे संपादक श्री. चंद्रकांत शेवाळे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट

बसलेले डावीकडून सौ. जयश्री दाते, डॉ. प्रकाश दाते, श्रीमती सुभद्रा कुंजीर, श्री. चंद्रकांत शेवाळे आणि सौ. पुष्पलता शेवाळे, उभे असलेले डावीकडून सौ. कल्पना बांदल, सौ. पुनम कुुंजीर, सौ. चंदन शेवाळे, श्री. राजेंद्र शेवाळे, श्री. नितीन कुंजीर आणि श्री. विजय बांदल

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तथा ‘ग्रहांकित’ मासिकाचे संपादक श्री. चंद्रकांत शेवाळे यांनी त्यांचा परिवार आणि नातेवाईक यांच्या समवेत २ जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांना सनातन संस्थेचे साधक श्री. प्रकाश जोशी आणि श्री. विशाल देशपांडे यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. साधक साधना म्हणून करत असलेली सेवा, आश्रमातील लादीवर ‘ॐ’ उमटणे, औदुंबराची झाडे उगवणे यांविषयी त्यांनी जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच आश्रमातील स्वच्छता, निटनेटकेपणा, व्यवस्थापन, साधकांची शिस्त आणि नियोजन कौशल्य पाहून सर्वांनी प्रसन्नतापूर्वक आश्‍चर्य व्यक्त केले.

 

आश्रम पाहून मन प्रसन्न झाले ! – चंद्रकांत शेवाळे

या वेळी श्री. चंद्रकांत शेवाळे म्हणाले, ‘‘आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. हिंदु धर्मियांसाठी संंस्था करत असलेल्या अथक परिश्रमासाठी एक हिंदु म्हणून मनापासून धन्यवाद आहेत.’’ सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘सूक्ष्मजगताविषयी सर्वदूर जागृती झाली पाहिजे. त्यामुळे याचा जिज्ञासूंना निश्‍चित लाभ होईल.’’

 

साधकांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका आणि
त्यांचे परिणाम फलकावर लिहिणे कौतुकास्पद ! – राजेंद्र शेवाळे

आश्रमात शिस्त आणि स्वच्छता उत्तम आहे. सर्व साधकांमध्ये सांघिक भावना दिसून येते. साधकांनी स्वत: त्यांच्याकडून (साधना करतांना) झालेल्या चुका आणि त्याचे परिणाम फलकावर लिहिले आहेत. हे कौतुकास्पद आहे.

क्षणचित्रे

१. सनातन संस्थेचे संत पू. सौरभ जोशी यांना भेटल्यावर श्री. चंद्रकांत शेवाळे म्हणाले की, पू. सौरभदादा यांची प्रभावळ चांगली असून पुष्कळ मोठी आहे.

२. आश्रमातील ध्यानमंदिरातील मूर्तींविषयी श्री. चंद्रकांत शेवाळे म्हणालेे, ‘‘ग्रंथ मुखपृष्ठ विभागात पाहिलेल्या देवतांच्या मूर्ती ध्यानमंदिरात पूजेला ठेवल्यावर त्यांचे चैतन्य अधिक वाढल्याचे जाणवले.’’

३. श्री. चंद्रकांत शेवाळे यांनी काही दिवसांसाठी आश्रमात येऊन रहाण्याची इच्छा व्यक्त केली.

 

ज्योतिषाचार्य श्री. चंद्रकांत शेवाळे यांचा परिचय

श्री. चंद्रकांत शेवाळे यांनी तरुण वयातच ज्योतिषाचार्य कै. भा.रा. खानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिषशास्त्राचे अध्ययन केले. वर्ष १९७७ पासून ज्योतिषविषयक मराठी नियतकालिकांमध्ये सर्वाधिक खप असलेल्या ‘ग्रहांकित’ मासिकाचे प्रकाशन आणि संपादन ते अव्याहतपणे करत आहेत.

ते ‘महाराष्ट्र ज्योतिष परिषद’ आणि ‘ज्योतिष परिषद पुणे’ यांचे संस्थापक सदस्य आहेत. सर्वाधिक विषयांचे अभ्यासक्रम असणारी भारतातील एकमेव संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे ते कार्याध्यक्ष आहेत. वर्ष १९८५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनामध्ये त्यांना विशेष कार्याविषयी ‘मॅन ऑफ द कन्व्हेन्शन’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आघाडीचे रमलतज्ञ म्हणून भारतभर त्यांची ख्याती आहे. रमलविद्येच्या आधारे एक दिवसीय क्रिकेट सामन्यातील विजयी संघाचे भाकित कसे करावे ? यावर त्यांनी विशेष संशोधन केले आहे. त्यांनी ‘वर्ष १९९९ ते २०१५ या कालावधीत झालेल्या क्रिकेटमधील पाचही विश्‍वचषक स्पर्धांत विजेता संघ कोणता असेल ?’ याचे अचूक भाकित करून एक विक्रम केला आहे. ‘वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील’, हे त्यांचे भाकितही खरे ठरले आहे.

३० वर्षांहून अधिक काळ ते रमलचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘रमल प्रवेश’ (मराठी आवृत्ती) या पुस्तकाच्या ४ आवृत्त्या आणि ‘रमल प्रवेश’ अन ‘रमल प्रश्‍न ज्योतिष’ (हिंदी आवृत्ती) प्रकाशित झाल्या आहेत. ‘रमल’ आणि ‘दिनवर्ष ज्योतिष पद्धती’वर त्यांची भारतभर अनेक ठिकाणी व्याख्याने झाली आहेत.

 

ज्योतिषाचार्य श्री. चंद्रकांत शेवाळे यांना मिळालेले पुरस्कार

ज्योतिष भास्कर, ज्योतिष महामहोपाध्याय, दिव्य ज्योतिषपराग ज्योतिषालंकार, ज्योतिष कौस्तुभ, शाईनिंग स्टार गॅलेक्सी ऑफ अ‍ॅस्ट्रॉलॉजर्स, मंदाश्री, शाहूराव मोडक, ज्योतिष द्रोणाचार्य, विश्‍वबंधू, ज्योतिष भूषण, रमल अलंकार, संस्कार आईचे या संस्थेचा पुरस्कार, रमल शिरोमणी आदी अनेक पदवी आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. या समवेतच त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊनही सन्मानित करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment