प्रयागराज येथील ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक अनुपम मिश्रा यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट

डावीकडून श्री. पंकज मिश्रा, सौ. अनविता मिश्रा, सौ. मंजू मिश्रा, अंशू द्विवेदी, श्री. ज्ञानेंद्रकुमार द्विवेदी, श्री. पंडित गिरिजाशंकर मिश्रा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु संत भक्तराज महाराज यांच्याविषयी माहिती देतांना श्री. अभिजीत सावंत
डावीकडून श्री. अनुपम मिश्रा, श्री. यश द्विवेदी, कु. राशी मिश्रा, श्री. आदित्य मिश्रा, श्री. प्रणव मिश्रा, श्री. द्वयाज द्विवेदी, सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना ‘एस्एस्आर्एफ्’चे श्री. ओजस्वी सेंगर, श्री. अनिकेत मिश्रा आणि चाकाच्या आसंदीत बसलेल्या सौ. निर्मला मिश्रा

रामनाथी (गोवा) – प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक श्री. अनुपम मिश्रा, त्यांचे बंधू ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’चे तांत्रिक व्यवस्थापक श्री. पंकज मिश्रा, त्यांचे आई-वडील आणि मेरठ येथील ‘बीएस्एन्एल्’चे महाव्यवस्थापक ज्ञानेंद्रकुमार द्विवेदी यांनी १३ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजीत सावंत आणि ‘एस्एस्आर्एफ्’चे श्री. ओजस्वी सेंगर यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे कार्य अन् आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. या वेळी त्यांनी ‘आश्रमात आल्याचे सार्थक झाले आणि प्रसन्नता जाणवली’, असे सांगितले.

क्षणचित्र

आश्रम पहातांना श्री. अनुपम मिश्रा यांना सुक्ष्म गंधाची अनुभूती आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment