कुंभमेळ्यात वंदनीय उपस्थिती असलेले परमहंस धाम, वृंदावनचे महामंडलेश्‍वर भैया दासजी महाराज यांचा सनातन संस्थेवर असलेेला विश्‍वास

कुंभक्षेत्री सनातन संस्थेच्या प्रदर्शनात चर्चा करतांना डावीकडून पू. प्रदीप खेमका, पू. नीलेश सिंगबाळ, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि महामंडलेश्‍वर भैया दासजी महाराज

 

१. ‘सनातन संस्थेचे साधक माझ्याकडे महाप्रसादाला
येत होते; म्हणून प्रथमच माझ्यावर कसलेही ऋण (कर्ज) झाले नाही !’

कुंभमेळ्यात वंदनीय उपस्थिती असलेले परमहंस धाम, वृंदावनचे महामंडलेश्‍वर भैया दासजी महाराज म्हणाले, ‘‘मी प्रत्येक वेळी कुंभ झाल्यावर कर्जबाजारी होतो; परंतु प्रथमच या वेळी माझ्यावर कसलेच ऋण (कर्ज) झालेले नाही. ‘हे केवळ तुमचे (सनातन संस्थेचे) सर्व साधक माझ्याकडे महाप्रसादाला येत होते; म्हणून झाले आहे’’, असे मला वाटते.

 

२. सनातन संस्थेवर असलेले प्रेम आणि आपुलकी यांमुळे शेवटपर्यंत
साधकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था करणारे महामंडलेश्‍वर भैया दासजी महाराज !

२०.२.२०१९ या दिवशी ते कुंभमेळ्यातून जाणार होते; म्हणून त्यांनी आदल्या रात्री आम्हाला ‘हा शेवटचा महाप्रसाद आहे’, असे सांगितले होते, तरीही दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी दूरभाष केला आणि ‘सर्वांनी महाप्रसादाला या’, असे सांगितले. महाप्रसादाला गेल्यावर ते साधकांना म्हणाले, ‘‘माझ्या मनात रात्री विचार आला, ‘तुम्ही जेवण कसे बनवणार ?’ तुमच्यासाठी सकाळचे जेवण बनवूनच जाऊया; म्हणून मी तुम्हाला महाप्रसादाला येण्यासाठी दूरभाष केला.’ त्यांनी जातांना जेवणासाठीची मोठी भांडी आणि धान्यही आपल्याला (सनातन संस्थेला) दिले होते.’

– श्री. शंभू गवारे, कुंभक्षेत्र, प्रयागराज (२२.४.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment