परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांच्या डोक्यावरील केसांच्या आकारात पालट होण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

परात्पर गुरु डॉ.आठवले यांच्या पाठच्या बाजूचे केस वळलेले दिसत आहेत.
परात्पर गुरु डॉ.आठवले यांच्या पाठच्या बाजूच्या केसांची टोके बाहेर आलेली दिसत आहेत.

 

१. केसांच्या मुळातून समष्टीसाठी आवश्यक चैतन्याचे प्रक्षेपण होणे

संतांच्या चरणांतून सर्वाधिक चैतन्याचे प्रक्षेपण होत असते.त्याप्रमाणे अवतारी कार्य करत असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोक्यावरील केसांच्या मुळातून समष्टीसाठी आवश्यक चैतन्य प्रक्षेपित होत असते.

 

२. चैतन्य प्रक्षेपणाचा केसांच्या आकारावर होणारा परिणाम

२ अ. केसांची टोके बाहेर दिसणे

केसांची ही अवस्था सूक्ष्म युद्ध चालू असल्याचे दर्शक आहे.परात्पर गुरु डॉक्टरांकडून वातावरणात शरीर अथवा केसांच्या माध्यमातून मारक शक्तीचे प्रक्षेपण होत असते.हे कार्य चालू असण्याच्या परिणामस्वरूप केसांची टोके बाहेर असल्याचे दिसते.हे सूक्ष्म युद्ध सातत्याने चालू असते.त्यामुळे केसांना त्यानुरूप आकार प्राप्त होतो.

२ आ.पाठच्या बाजूचे केस वळलेले असणे

पाण्याचा प्रवाह परिस्थितीनुरूप वळण धारण करतो,त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्यातील तारक अथवा मारक शक्तीचे आवश्यकतेनुसार वातावरणात प्रक्षेपित होत असते.ही प्रक्रिया सातत्याने होत असल्याने केसांची घडण ही प्रक्षेपित होत असलेल्या शक्तीनुरूप होते.त्यामुळे केसांना विशिष्ट,म्हणजे वळणाप्रमाणे आकार प्राप्त होतो.

२ इ.केसांतून ईश्‍वरी शक्ती प्रक्षेपित होतांना केसांची सर्वसाधारण स्थिती न रहाण्यामागील कारण

परात्पर गुरु डॉक्टरांच्या केसांतून साधकांना शक्ती मिळणे अथवा वाईट शक्तींशी होणार्‍या सूक्ष्म युद्धानुसार तारक अथवा मारक शक्तीचे प्रक्षेपण होते असते.हे प्रक्षेपण अल्प-अधिक प्रमाणात किंवा दिशेनुसार होत असते.ही शक्ती जेव्हा एकसारख्या प्रमाणात आणि तारक स्वरूपात केसांद्वारे प्रक्षेपित होत,तेव्हा त्याचा केसांच्या आकारावर विशेष परिणाम दिसत नाही;परंतु सूक्ष्म युद्धाच्या तीव्रतेनुसार ईश्‍वरी शक्तीच्या प्रवाहात होत असलेल्या पालटांचा परिणाम केसांवर होतो.पुढील तत्त्वावर वरील सूत्र आधारित आहे.

केसांतून तारक-मारक शक्तीचे प्रक्षेपण –>दिशानुरूप शक्तीचे प्रक्षेपण –>सूक्ष्म युद्धानुरूप शक्तीचे प्रक्षेपण = केसांच्या आकारात पालट होणे

२ ई.ईश्‍वरी शक्तीच्या प्रक्षेपणाने केसांच्या स्थूल रचनेत पालट होण्याची प्रक्रिया

केसांतून प्रक्षेपित होणार्‍या अल्प-अधिक शक्तीने केसांना एक स्थिती,म्हणजे तात्पुरता आकार प्राप्त होतो.असे सातत्याने होऊ लागले की,तो केसांचा स्वभाव बनतो,म्हणजे केसांना तो आकार दीर्घकालीन प्राप्त होतो.यामध्ये ईश्‍वरी शक्तीमुळे केसांच्या अणू-रेणूंमध्ये पालट घडतो.त्यानंतर केसांच्या आकारात पालट होत जातो.पुढील तत्त्वावर वरील सूत्र आधारित आहे.

केसांतून प्रक्षेपित होणारी शक्ती –>केसांना स्थिती प्राप्त होणे (तात्पुरता आकार)–>केसांचा स्वभाव बनणे (केसांच्या अणू-रेणूत पालट होणे)–>केसांना दीर्घकालीन आकार प्राप्त होणे

 

३.सूक्ष्म प्रक्रियेचा स्थूल परिणाम

सूक्ष्म प्रक्रियेचा स्थूल परिणाम म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या केसांनी धारण केलेले विविध आकार होय.

–  श्री.राम होनप,सनातन आश्रम,रामनाथी,गोवा. (२७.६.२०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment