‘१७.५.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ दौर्यातील साधकांसह जम्मू येथील काही तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी जम्मू येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि ज्योतिष विशारद डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांच्याकडे मुक्काम केला.
१. जम्मू येथील ज्योतिष विशारद डॉ. शिवप्रसाद रैना यांचा परिचय
जम्मू येथील डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांचा वेदांचा अभ्यास असून ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून वेदाध्ययनाला आरंभ केला. ते स्वतः ‘ज्योतिष विशारद’ आहेत. ते जम्मू येथील अनेक शिक्षणसंस्था आणि सामाजिक संस्था यांना मार्गदर्शन करतात. ते आध्यात्मिक चिंतक आहेत. अनेक भक्त त्यांना ‘रैना गुरुजी’ असे संबोधतात.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाचे रक्षण करणे महत्त्वाचे !
ज्योतिष विशारद डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिले नसतांनाही सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे मोठे संत आहेत. त्यांच्या देहाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. गुरुदेवांची प्रकृती सुधारल्यास राष्ट्राची स्थितीही सुधारेल ! (‘परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा म्हणाले होते, ‘‘राष्ट्र-धर्म आजारी आहेत; म्हणून मी आजारी आहे.’’ – संकलक) ते राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करत असल्यामुळे त्यांना अंगविकृती झाली आहे. (पाय वाकडे होणे, कधी हातांवर किंवा पायांवर सूज येणे, अशा स्थितीला ‘अंगविकृती’ म्हणतात.) (‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची स्थिती अशीच आहे.’ – संकलक)
या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी एक विधी सांगितला.’’