गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेल्या मिश्रणाचे महत्त्व

कडुनिंब
कडुनिंब

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण सिद्ध (तयार) केले जाते. या दिवशी मिश्रणासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

 

१. कडुनिंब : महत्त्व

असे तयार करा कडुनिंबाचे चूर्ण (चटणी)

कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून प्रसाद तयार करावा व तो सर्वांना वाटावा.

जो यजमान आहे त्याला ते रोगशांती, व्याधींचा नाश व्हावा आणि सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी (संपत्ती) लाभावी म्हणून भक्षण करण्यास सांगितले आहे.

(संदर्भ आणि हे बनविण्याचा विधी हे प्रती संवत्सराच्या पंचागामध्ये उधृत केलेले असते.)

 

२. गुढीपाडव्याच्या मिश्रणावर
ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी आकृष्ट होणे

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

मिश्रणामध्ये शक्‍ती, चैतन्य आणि आनंद यांच्या लहरी एकाच वेळी आकृष्ट होत असतात; पण त्यांची पुढील प्रक्रिया लक्षात येण्यासाठी एका वेळी एक प्रकारच्या लहरींची पूर्ण प्रक्रिया दिली आहे.

अ. मिश्रणात ईश्‍वराकडून शक्‍तीचा प्रवाह आकृष्ट होणे

आ. मिश्रणामध्ये कार्यरत मारक शक्‍तीचे वलय निर्माण होणे

इ. मिश्रणामध्ये तेजतत्त्वात्मक शक्‍तीच्या कणांची निर्मिती होणे

ई. तेजतत्त्वात्मक तारक-मारक शक्‍तीच्या कणांचे वातावरणात प्रक्षेपण होणे

उ. ईश्‍वराकडून चैतन्याचा प्रवाह मिश्रणामध्ये आकृष्ट होणे

ऊ. मिश्रणात चैतन्याचे वलय निर्माण होणे

ए. चैतन्याच्या वलयातून चैतन्याच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होणे

ऐ. ईश्‍वराकडून आनंदाचा प्रवाह मिश्रणात आकृष्ट होणे

ओ. मिश्रणात आनंदाचे वलय निर्माण होणे (मिश्रणा ग्रहण केल्यानंतर याचे देहात प्रक्षेपण होणे)’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ( फाल्गुन कृ. अष्टमी, कलियुग वर्ष ५११० (१९.३.२००९)

 

३. गुढीपाडव्याचा कडुनिंब घालून बनवलेले मिश्रण ग्रहण केल्यामुळे देहावर होणारा परिणाम

अ. गुढीपाडव्याला कडुनिंबाचे मिश्रण ग्रहण केल्यावर देहावर सूक्ष्मातून होणारा परिणाम सूक्ष्म-चित्राच्या माध्यमातून समजून घेऊया.

१. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेले मिश्रण ग्रहण करतांना ‘मला चैतन्य प्राप्त होत आहे’, असा भाव ठेवल्यामुळे व्यक्‍तीच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भावाचे वलय निर्माण होणे

२. ब्रह्मांडातील ईश्‍वरी चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होणे

३. पूर्ण देहात शक्‍तीचे कण पसरणे

४. अनाहतचक्राच्या ठिकाणी शक्‍तीचे कार्यरत वलय निर्माण होणे आणि देहाला कार्य करण्यास आवश्यक ऊर्जा-शक्‍ती प्राप्त होणे

५. कडुनिंब घालून बनवलेले मिश्रण ग्रहण केल्यावर मुखाद्वारे चैतन्याचा प्रवाह देहात प्रक्षेपित होणे

६. देहात चैतन्याची वलये निर्माण होऊन देहाची अंतर्गत शुद्धी होणे

७. बुद्धी सात्त्विक बनणे

८. देहातील चक्रांची शुद्धी होणे आणि देहावरील काळे आवरण दूर होणे’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (फाल्गुन कृ. दशमी, कलियुग वर्ष ५११० (२२.२.२००९))

आ. कडुनिंब घालून बनवलेले मिश्रण ग्रहण केल्यावर जाणवलेली सूत्रे आणि एका अज्ञात शक्‍तीने केलेले विश्‍लेषण

‘फाल्गुन कृ. सप्तमी, कलियुग वर्ष ५११० (१८.३.२००९) या दिवशी मी कडुनिंबाचे मिश्रण ग्रहण केल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि एका अज्ञात शक्‍तीने त्याचे केलेले विश्‍लेषण येथे देत आहे.

१. मी कडुनिंबाचे मिश्रण ग्रहण करण्यास हातात घेतल्यावर माझ्या कानांतून काळा धूर बाहेर पडू लागला.
विश्‍लेषण

अ. मिश्रण हातात घेतल्यावर पिवळट-पांढर्‍या रंगाच्या चैतन्याच्या कणांनी डोळ्यांच्या माध्यमातून देहात प्रवेश केल्यावर माझ्यावरील काळे आवरण दूर झाल्याचे जाणवले.

आ. ‘मिश्रणातील सर्व पदार्थ हे प्रामुख्याने तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्य करणारे आहेत’, असे जाणवले.

इ. तेजतत्त्व हे ईश्‍वराच्या क्रियाशक्‍तीच्या स्तरावर उत्पत्तीदर्शक कार्य करून जिवातील आवश्यक त्या घटकांना स्थिर करत असल्याचे जाणवले.

२. ही क्रिया इतक्या जलदगतीने झाली की, त्यात मला काही कळण्याची संधीच मिळाली नाही.
विश्‍लेषण

कडुनिंब आणि इतर पदार्थ घालून बनवलेले हे मिश्रण ज्या (गुढीपाडव्याच्या) दिवशी निर्माण केले जाते, त्या दिवशी विश्‍वातील सर्व दिवसांपैकी सर्वांत अधिक प्रमाणात तेजतत्त्व पृथ्वीवर आकृष्ट होत असल्याचे जाणवले. तीच गती साधकाला येथे अनुभवण्यास मिळाली.

३. मी हातात घेतलेल्या मिश्रणामध्ये मला अंशात्मक स्वरूपात ब्रह्मतत्त्वाचे दर्शन झाले.
विश्‍लेषण

गुढीपाडव्याचे मिश्रण हा जिवाला उत्पत्तीदर्शक चैतन्य प्रदान करत असल्यामुळे उत्पत्तीशी संबधित ब्रह्मतत्त्वाचे दर्शन झाले.

४. मला पिवळट-पांढर्‍या प्रकाशरूपी रंगामध्ये ब्रह्मतत्त्वाचे दर्शन झाले.
विश्‍लेषण

अ. ही ईश्‍वराच्या निर्गुण-सगुणतेवर तारक स्वरूपात कार्य करणार्‍या चैतन्याची अनुभूती होती.

आ. हा प्रकाश साधकाला आवश्यक घटकाप्रमाणे कार्य करणारा असल्याचे जाणवले. साधकाला प्राणशक्‍तीची आवश्यकता असल्याने येथे त्याला या चैतन्यातून त्याचा पुरवठा झाला.

५. देहातील काळ्या शक्‍तीच्या विघटनाची क्रिया होण्यापेक्षा चैतन्य प्रक्षेपणाची क्रियाच मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे जाणवले.
विश्‍लेषण

कडुनिंब घालून बनवलेले मिश्रण ग्रहण केल्यावर ब्रह्मतत्त्वासह क्रियाशक्‍तीच्या स्तरावर कार्य करणार्‍या विष्णुतत्त्वाच्या तारकभावाची ती अनुभूती होती.

६. माझ्या देहात चैतन्य जातांना ते इतर अवयवांपेक्षा डोळ्यांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात देहात प्रवेश करत असल्याचे जाणवले.
विश्‍लेषण

डोळे हे जिवातील तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्य करणार्‍या घटकातील एक घटक असल्यामुळे त्याप्रमाणे जाणवले.

७. पाठीतील स्थानांमध्ये मणक्यातून आगीचे पाणी एका लयीत खाली कटीपर्यंत जात असल्याचे जाणवले.

(कु. प्रियांका लोटलीकर यांनी काढलेल्या सूक्ष्म-चित्रात त्यांना असेच जाणवल्याचे त्यांनी सांगितले.)

विश्‍लेषण

अ. मिश्रणातील चैतन्य तारक स्तरावर जिवातील सप्तचक्रांमध्ये चैतन्याचे प्रक्षेपण करण्याचे कार्य करत असल्यामुळे ते देहात सर्वत्र पसरत असल्याची अनुभूती न येता एका लयीत मणक्यातून जात असल्याचे जाणवले.

आ. यात ईश्‍वराकडून कार्यरत चैतन्य देहात प्रवेश करण्याची दिशा ठरवत असल्याचे जाणवले. (म्हणजे देहात जाणार्‍या चैतन्याची अनुभूती पुढील भागातून न जाणवता मागील, म्हणजे पाठीकडील भागात जाणवली.)

इ. चैतन्य हे शीतलच असते; पण देहावर काळ्या शक्‍तीचे आवरण असल्यामुळे ते आगीप्रमाणे जाणवले.

८. ‘श्री गुरवे नम: ।’ हा नामजप आपोआप चालू होणे
विश्‍लेषण

अ. जिवाच्या भावाप्रमाणे त्याचा नामजप चालू होण्याची क्रिया झाली. (येथे ‘प्रसाद हा गुरूंचा आहे’, असे वाटणे, हा भाव झाला आणि त्याप्रमाणे कार्य होणे, ही स्थिती झाली.)

आ. येथे मिश्रणात कार्यरत असलेले उत्पत्तीदर्शक ब्रह्मतत्त्व आणि स्थितीदर्शक विष्णुतत्त्व यांची अनुभूती झाली. भाव जागृत होणे, हे उत्पत्तीशी, तर त्याप्रमाणे कार्य होणे, हे स्थितीशी संबधित आहे.

इ. गुढीपाडवा हा दिवस उत्पत्तीशी संबंधित असल्यामुळे येथे लयाशी संबंधित शक्‍तीचे कार्य अंशात्मक स्वरूपात असल्याचे लक्षात येते.

प.पू. डॉक्टर, या छोट्याशा प्रसंगातून मला शिकण्याची संधी दिल्यामुळे मी आपल्या चरणी ऋणी आहे.’

– श्री. विशाल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
‘गुढीपाडवा’ या लेखमालिकेतील अन्य लेख

१. गुढीपाडवा या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व, वर्षफल ऐकण्याचा लाभ, सणांचे चक्र यांविषयी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी गुढीपाडव्याचे महत्त्व यावर क्लिक करा !

२. हल्ली काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराचे तत्सम काही गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते याविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन वाचण्यासाठी ‘गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !’ यावर क्लिक करा ! यावर क्लिक करा !

गुढी पूजन चलच्चित्रपट (Video)

1 thought on “गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेल्या मिश्रणाचे महत्त्व”

Leave a Comment