रामजन्माच्या दिवशी साजर्या केल्या जाणार्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. आता आपण ऐकणार आहोत श्रीरामाचा पाळणा. हे गीत प्रत्यक्ष ऐकण्यापूर्वी त्यासंबंधी काही माहिती घेणे उपयुक्त ठरेल.
पाळणा गीताचे वैशिष्ट्य
गीत गातांना गायकाच्या भावाप्रमाणेच गीतामधील शब्दांचा उच्चार, शब्द म्हणण्याची गती, शब्द जोडून म्हणणे किंवा वेगवेगळे म्हणणे इत्यादींवर शब्दांतून निर्माण होणारी सात्त्विकता आणि चैतन्य अवलंबून असते. हे समजण्यासाठी नादशास्त्राचे ज्ञान असण्याबरोबरच सूक्ष्म अभ्यास, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील कळण्याची क्षमता असणेही आवश्यक ठरते. असे सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असलेल्या, संगीतशास्त्राच्या अभ्यासिका, सनातनच्या साधिका सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी संगीतशास्त्राचा तसेच सूक्ष्मातील अभ्यास करून श्रीरामाच्या या पाळण्यातील शब्दांचा उच्चार, गती इत्यादि ठरवले आहे. यासाठी त्यांना प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यामुळे येथे दिलेला पाळणा अधिक सात्त्विक आणि चैतन्यमय झाला आहे. या पाळण्याचे वैशिष्ट्य असे की, केवळ एकदाच गायल्यावर याचे ध्वनीमुद्रण अंतीम झाले आहे. तर ऐकूया, श्रीरामाचा पाळणा …
श्रीरामाचा पाळणा
बाळा जो जो रे कुलभूषणा । दशरथनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ।।धृ।। पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी । पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ।।१।। रत्नजडित पालख । झळके अमोलिक । वरती पहुडले कुळदिपक । त्रिभुवननायक ।।२।। हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी । पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकारी ।।३।। विश्वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया । तुजवरी कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ।।४।। येऊनि वसिष्ठ सत्वर । सांगे जन्मांतर । राम परब्रह्म साचार । सातवा अवतार ।।५।। याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा । जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरिल गौतमदारा ।।६।। पर्णिल जानकी सुरूपा । भंगुनिया शिवचापा । रावण लज्जित महाकोपा । नव्हे पण हा सोपा ।।७।। सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतील शिळा । त्यावरी उतरुनिया दयाळा । नेशी वानरमेळा ।।८।। समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण । देव सोडविल संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ।।९।। राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला । दास विठ्ठले ऐकिला । पाळणा गायीला ।।१०।।
Sundar
Very nice to share the information
Very informative and satisfying.
Palana aikun shant vatla…
खूप छान वाटलं आजच्या दिवशी श्रीरामाचा पाळणा ऐकून
अतिशय छान अन सुमधुर पाळणा
अप्रतिम पाळणा, भाव जागृती होते
अतिशय सुंदर आणि मनमोहक छायाचित्र आणि ऑडिओ आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण मिळून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्ही कदम परिवार रोज सकाळी व सायंकाळ २ वेळा आरती पण घेत आहोत.
अतिशय सुंदर आणि मनमोहक छायाचित्र आणि ऑडिओ आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण मिळून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
पाळणा ऐकल्यावर मन एकदम शांत झाले. सारखा सारखा ऐकाव वाटतोय.
अप्रतीम
खूप भावपूर्ण आहे….ऐकताना शांत वाटतं,, मधुर आणि चैतन्यदायी नाद मनाला भावतो…पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते..खूप खूप धन्यवाद