१. आश्रमात सकारात्मक ऊर्जा असून येथे येऊन
साधना आणि सेवा करण्याची इच्छा आहे ! – अधिवक्ता विजयशेखर
‘इतर ठिकाणांच्या तुलनेत आश्रमातील वातावरण अत्यंत वेगळे आहे. येथे शांतता आहे. येथे अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असून कोणालाही ती अनुभवायला येईल. मी यापूर्वी २ वेळा आश्रमात आलो होतो. या वेळी ‘पूर्णवेळ साधना करणार्यांची संख्या वाढली आहे’, असे मला दिसले. याचे कारण आश्रमातील वातावरण एवढे चांगले आहे की, कोणालाही ‘येथून परत घरी जाऊ नये’, असेच वाटत असेल ! आपली साधना वाढवण्याच्या दृष्टीने येथे स्वच्छता, नीटनेटकेपणा इत्यादी अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आश्रमात आल्यानंतर थकवा जाऊन पुष्कळ उत्साह जाणवतो. येथे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाची स्पंदने जाणवून असे वाटले की, येथे येऊन मला साधना आणि सेवा करायची आहे.’
– अधिवक्ता विजयशेखर, यलहंका, बेंगळूरू, कर्नाटक. (२६.५.२०१९)
२. आश्रमातील स्वच्छता, शिस्त आणि कार्यपद्धती उत्कृष्ट
असून येथे सकारात्मक स्पंदने जाणवतात ! – अधिवक्ता दत्तात्रेय देशपांडे
‘आश्रमातील वातावरण शांत असून येथे सकारात्मक स्पंदने जाणवतात. हा अनुभव अद्वितीय आहे. मी आश्रमात प्रथमच आलो आहे; मात्र हा अनुभव वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील स्वच्छता, शिस्त आणि कार्यपद्धती उत्कृष्ट आहेत. आश्रमातील व्यवस्था आणि कार्यपद्धत अनुकरणीय असून येथे शिकण्यासारखे पुष्कळ आहे. साधकांकडून आश्रमाच्या संदर्भातील प्रत्येक लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्टही त्याच्या पार्श्वभूमीसह उत्कृष्ट प्रकारे सांगितली जाते.’
– अधिवक्ता दत्तात्रेय देशपांडे, बेंगळूरू, कर्नाटक. (२६.५.२०१९)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक