‘ईश्वर हा सर्वगुणसंपन्न आहे, तसेच तो दोषविरहित आहे. साधना करून ईश्वराशी एकरूप होत गेल्यावर त्याची अधिकाधिक गुणवैशिष्ट्ये आपल्यात येतात आणि आपला देहही ईश्वरासमान तेजस्वी बनतो. गेली अनेक वर्षे कठोर तपःसाधना केलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा देहही अनेक दैवी गुणवैशिष्ट्यांनी विभूषित आहे. मे २०१९ मध्ये काढलेल्या त्यांच्या खालील छायाचित्रांत त्यांची अध्यात्मातील अत्युच्च अशी निर्गुण स्थिती दिसून येते. ही छायाचित्रे पहातांना त्यांचे ईश्वराशी असलेले एकरूपत्व प्रकर्षाने जाणवते. त्यांचे अस्तित्व छायाचित्रात जाणवत नाही. एका अर्थाने ‘ते छायाचित्रात दिसत आहेत; मात्र ते तेथे नाहीतच’, असे वाटते. त्यांच्या देहावर अनेक शुभचिन्हेही आली आहेत.
आज त्यांच्या १०० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने खर्या आध्यात्मिक विभूती कशा असतात, याची वाचकांना प्रचीती येण्यासाठी ही छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत. स्वतः निर्गुण स्थितीत असूनही आम्हा साधकांवर कृपाछत्र धरणारे योगतज्ञ दादाजी यांच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्यासारखे सिद्धपुरुष भारतात आणि हिंदु धर्मातील आहेत, हे आपले भाग्य आहे. अशा सिद्धपुरुषांचे मार्गदर्शन घेऊन सर्वांनी साधनेत प्रगती केली, तरच त्यांचा खरा लाभ करून घेतला, असे होईल. ‘सर्वांना अशी बुद्धी होवो’, ही योगतज्ञ दादाजींच्या चरणी प्रार्थना !’
‘विधिलिखित’ हा शब्द ‘विधि’ म्हणजे ब्रह्मदेव आणि ‘लिखित’ म्हणजे ‘लिहिलेले’ या दोन शब्दांनी बनला आहे. त्यालाच आपण नेहमीच्या भाषेत ‘प्रारब्ध’ म्हणतो. आपण एखादी घटना, विशेषतः अनिष्ट घटना घडून गेल्यावर मनाच्या सांत्वनासाठी तो शब्द वापरतो.
‘विधिलिखितात, प्रारब्धात काय आहे ? कालमाहात्म्यानुसार काय होणार आहे ?’, हे ज्योतिषी ज्योतिषशास्त्राच्या आधारे सांगू शकतात. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्यासारख्या सिद्धपुरुषांना कशाचाच आधार लागत नाही. ते काळाचा पडदा ओलांडून भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांतील अनेक घटना सांगू शकतात आणि जनहितार्थ आवश्यक असल्यास अनिष्ट घटना टाळू शकतात.
सनातनवरील बंदी आणि प.पू. डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळण्यासाठी, तसेच साधकांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी विविध विधी, अनुष्ठाने करून साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे, भक्तवत्सल योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या प्रती शब्दांत कृतज्ञता व्यक्त करणे अशक्यच आहे; मात्र त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने योगतज्ञ दादाजी यांच्या कोमल चरणी ही शब्दसुमनांजली अर्पण करत आहोत. ‘योगतज्ञ दादाजींची कृपादृष्टी सनातन परिवारावर अशीच रहावी’, अशी त्यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना !
चैतन्यमूर्ती, कृपासिंधु, वात्सल्यमूर्ती आणि सकल साधकांचा
आधार असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कोटी कोटी नमन !
देहावरील अलौकिक शुभचिन्हे आणि दैवी पालट यांनी विभूषित योगतज्ञ दादाजी !
कपाळावर पांडुरंगाप्रमाणे दिसणारा टिळा (गोलात आकार स्पष्ट केला आहे.) या भावमुद्रेतून त्यांची शून्यावस्था; म्हणजेच निर्विचार स्थिती दिसून येते.
चरणांच्या त्वचेवर आलेली चकाकी (त्वचा तेल लावल्याप्रमाणे चमकत आहे.), तसेच चरणांच्या नीलांमध्ये दिसणारे ‘ॐ’ही गोलात स्पष्ट करून दाखवले आहेत.
योगतज्ञ दादाजी यांची शून्यावस्था !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने योगतज्ञ दादाजींचा सन्मान करतांना श्री. अतुल पवार, त्यांच्या बाजूला पू. (सौ.) अश्विनी पवार
तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !
‘संतांच्या देहासंदर्भातील वैशिष्ट्यांविषयी संशोधन करून त्यामागचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत.
१. योगतज्ञ दादाजी यांच्या डोक्यावरील त्वचेवर ‘ॐ’ उमटण्यामागील वैज्ञानिक कारण काय ?
२. योगतज्ञ दादाजी यांच्या चरणांना कोणतेही स्थुलातील कारण नसतांना चकाकी येण्यामागे, तसेच चरणांच्या नीलांचा आकार अनेक ठिकाणी ‘ॐ’सारखा दिसण्यामागे कोणते कारण आहे ?
३. संतांच्या देहासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करता येईल ?
४. उच्च आध्यात्मिक पातळी असलेले संत स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या देहासंदर्भात असे पालट घडवून आणू शकतात का ?’ (प्रत्यक्षात उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांना स्वतःची इच्छा नसते.)
या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’
– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : mav.research2014@gmail.com