रंगपंचमीच्या निमित्ताने भारतखंडात सर्वत्र रंगांची उधळण चालू असतांना उच्च लोकात हा सण कशा प्रकारे साजरा होत असेल, याची उत्सुकता आणि कुतुहल आपणा सर्वांनाच असेल. या उच्च लोकांत जी रंगपंचमी खेळली जाते, तीही किती उच्च स्तराची असते, याचे दृश्य सनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांना दाखवून आणि त्याविषयीची माहिती देऊन ईश्वराने हे गुपीत आपणासाठीही उघड केले आहे.
१. स्वर्गलोकातील रंगपंचमी
‘स्वर्गलोकातील भाव असलेल्या देवतांनी श्रीविष्णूला स्वर्गलोकात रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्याची विनंती केली. त्यानंतर श्रीविष्णूने त्याचे एक रूप स्वर्गलोकात पाठवले. स्वर्गलोकातील यक्ष, गंधर्व, किन्नर आणि अप्सरा यांनी गायन, वादन आणि नृत्य करून श्रीविष्णूचे स्वागत केले. भाव असलेल्या देवगणांचा या भावरंगपंचमीच्या कार्यक्रमात सहभाग होता. सर्व जण रंगांची उधळण करून रंगपंचमीचा उत्सव साजरा करत होते. अप्सरा भावविभोर होऊन नृत्य करत होत्या. गंधर्व भावपूर्ण गायन आणि वादन करत होते. हा आनंदसोहळा पहाणार्या इतर देवता आणि ऋषीमुनी यांचा श्रीविष्णुप्रती भाव जागृत झाला होता. (हे दृश्य पाहतांना मलाही आनंद जाणवत होता आणि स्वतःचा विसर पडत होता. – कु. मधुरा भोसले )
२. ऋषीलोकांत गोपींनी श्रीकृष्णाशी खेळलेली रंगपंचमी
स्वर्गलोकातील रंगपंचमीचे दृश्य पाहिल्यावर श्रीविष्णूने सांगितले, ‘ही सुखमय रंगपंचमी होती. आता भक्तीच्या स्तरावरची आनंद आणि शांती यांची अनुभूती देणारी रंगपंचमी बघ.’ त्यानंतर मला स्वर्गलोकाच्या वरच्या दिशेने गेल्याचे जाणवले. समोर ऋषीलोक दिसू लागला. तेव्हा तेथील ऋषी गोपींप्रमाणे दिसू लागले. प्रत्येक गोपीसोबत एक श्रीकृष्ण होता. गोपी श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन त्याच्या गालावरून हात फिरवत होत्या. तेव्हा त्यांच्या बोटांना रंग लावलेला नसतांनाही श्रीकृष्णाच्या गालावर विविध रंगांच्या छटा दिसत होत्या. त्यानंतर गोपी आपापसांत आणि श्रीकृष्णाला रंग लावण्यात इतक्या दंग झाल्या की, त्यांना कशाचेच भान उरले नाही. तेव्हा श्रीकृष्णाची सर्व रूपे अदृश्य झाली आणि त्याचे मूळ रूप एका बाजूला जाऊन बसले. मूळ रूप गोपींचा खेळ लांबूनच पहात होते आणि मनोमन हसत होते.
३. गोपींनी भक्तीभावाप्रमाणे श्रीकृष्णाला विविध प्रकारे आणि विविध ठिकाणी रंग लावणे
गोपींच्या भक्तीचा
|
भक्तीच्या प्रकारानुसार गोपींनी
|
१. बालभावाप्रमाणे भक्ती करणारे | लहान बाळ बनून श्रीकृष्णाजवळ जाणे, श्रीकृष्णाने त्यांना उचलून घेणे, बाळाने श्रीकृष्णाचे गाल आणि खांदा यांवरून प्रेमाने हात फिरवणे अन् त्याला पिवळा रंग लावणे |
२. मधुरा | गालाला गुलाबी रंग लावणे |
३. स्मरण आणि आत्मनिवेदन |
श्रीकृष्णाची मानसपूजा करून त्याला मनोमन स्मरून त्याचे हात आणि पाय यांना निळा रंग लावणे |
४. अर्चन | श्रीकृष्णाची मानसपूजा करून त्याला लाल रंगाचा टिळा लावणे |
५. दास्य | चरणांना पांढरा रंग लावणे |
६. सख्य | श्रीकृष्णाला आलिंगन देऊन त्याच्या पाठीला केशरी रंग लावणे |
७. विरोधीभक्ती (आसुरी भक्ती करणारे असुर) | श्रीकृष्णावर दुरून जांभळा रंग टाकणे |
४. तप आणि सत्य लोकांतील रंगपंचमी
तपलोकाच्या पुढे ऋषींची पातळी अधिक असल्याने, तसेच ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ हे तत्त्व सातत्याने आचरणात येत असल्याने त्यांना ‘रंगपंचमी खेळावी किंवा हिंदु धर्मातील कोणताही सण साजरा करावा’, अशी इच्छा होत नाही.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २२.३.२००६, दुपारी ५ ते ५.३०)