भादरा, हनुमानगड (राजस्थान) येथील प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांना ग्रंथ भेट देतांना श्री. शिवाजी वटकर (डावीकडे)

पनवेल – राजस्थानमधील भादरा, हनुमानगड येथील संत आणि अखिल भारतवर्षीय धर्मसंघ तथा स्वामी करपात्री फाऊंडेशनचे पीठाधीश्‍वर प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांनी १२ मे या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांनी प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांचा हार घालून, तसेच शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. सनातननिर्मित ‘धार्मिक उत्सव एवं व्रतोंका अध्यात्मशास्त्रीय आधार’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ त्यांना या वेळी भेट दिला. सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांच्याशी या वेळी संवाद साधला.

श्री. शिवाजी वटकर यांनी प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांना आश्रमातील संस्थेच्या कार्याविषयी अवगत केले. प.पू. डॉ. चैतन्य महाराज यांनी ध्यानमंदिर आणि परात्पर गुरु पांडे महाराजांची खोली यांचे भावपूर्ण दर्शन घेतले. या वेळी त्यांचे भक्त श्री. दिलीप काब्रा उपस्थित होते.

 

प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांचा सनातनशी असलेला ऋणानुबंध !

१. वर्ष २०१६ मध्ये उज्जैन (मध्यप्रदेश) येथील कुंभमेळ्यात प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांनी सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी आणि सनातनच्या साधकांना रहाण्यासाठी त्यांची भूमी उपलब्ध करून दिली होती. ज्या ठिकाणी त्यांचे मोठे यज्ञ असतात, तेथे ते सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यास अनुमती देतात.

२. ९ जानेवारी २०१९ या दिवशी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०१९ आयओएस्’ या इंग्रजी भाषेतील ‘अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप’चे उद्घाटन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment