१. प्राचीन गणपति मंदिराचा इतिहास !
१.अ. भगवान श्रीकृष्ण आणि पांडव यांनी ५,५००
वर्षांपूर्वी ‘सिद्धीविनायक’ या गणपतीचे स्वतः पूजन केलेले असणे
‘गुजरात राज्याची राजधानीपासून ९० कि.मी. दूर अंतरावर ‘गणपतिपुरा’ नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी गुजरातमधील सर्वांत प्राचीन असे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या पुजार्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘५,५०० वर्षांपूर्वी श्रीकृष्ण आणि पांडव यांनी या गणपतीचे पूजन केले होते. ‘या गणपतीची पूजा केल्यानंतर श्रीकृष्णानेे द्वारकेत राहून अनेक वर्षे राज्य केले’, असे म्हटले जाते. या गणपतीचे नाव ‘सिद्धीविनायक’ आहे. भगवान श्रीकृष्ण या गणेशाची पूजा करायचे. त्यामुळे या स्थानाला पूर्वी ‘गणेश द्वारका’ असे म्हटले जायचे. जेव्हा पांडव श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला जायचे, तेव्हा प्रत्येक वेळी या गणपतीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे.
१.आ. एका शेतकर्याला शेत नांगरतांना स्वयंभू गणपतीची मूर्ती सापडून श्री गणेशाच्या
इच्छेनेच एका स्थानी त्या मूर्तीची स्थापना होऊन त्या स्थानाला ‘गणपतिपुरा’ असे नाव पडणे
कलियुगात अनेक वर्षे या मंदिराविषयी कुणालाच ठाऊक नव्हते. ८०० वर्षांपूर्वी कर्णावतीच्या जवळ असलेल्या ‘कोट’ नावाच्या गावात एका शेतकर्याला शेत नांगरतांना स्वयंभू गणपतीची मूर्ती मिळाली. ती मूर्ती उजव्या सोंडेची होती.
या मूर्तीच्या कानात कुंडल, पायात सोन्याचे तोडे, तसेच डोक्यावर मुकुट आणि कंबरेला कंबरपट्टाही होता. ही मूर्ती मिळाल्यावर काही वेळातच आसपासच्या अनेक गावांतील लोक गोळा झाले आणि प्रत्येकाला वाटू लागले, ‘या मूर्तीची स्थापना स्वतःच्या गावातील मंदिरात व्हायला हवी.’ नंतर सर्वांच्या संमतीने एका बैल नसलेल्या बैलगाडीत मूर्ती ठेवण्यात आली. मूर्ती ठेवल्यावर बैलगाडी लगेच चालू झाली. नंतर ती ज्या ठिकाणी थांबली, त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आपोआप गाडीतून खाली आली. नंतर त्या स्थानी मूर्तीची स्थापना करण्यात आली. या स्थानाला ‘गणपतिपुरा’ असे नाव पडले. या मूर्तीला तूप आणि शेंदूर यांचा लेप लावल्याने मूर्तीचा रंग शेंदरी आहे.’