प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटली की, आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो. याऐवजी बिंदूदाबन उपचारपद्धत अवलंबली, तर आपला वेळ आणि पैसा वाचण्यासह विकारावर मूलगामी उपचार होण्यासही साहाय्य होते. बहुतेकांना बिंदूदाबन उपचारपद्धत ही चीनमधून आलेली आहे, असे वाटत असते; परंतु प्रत्यक्षात तिचा उगम हिंदुस्थानातच झालेला आहे. या शास्त्राची तोंडओळख सनातनचा ग्रंथ शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन यात दिली आहे, तर नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार या ग्रंथात डोकेदुखी, ताप आदी नेहमीच्या ८०हून अधिक विकारांवर उपचार कसे करावेत ?, याचे मार्गदर्शन केले आहे. याव्यतिरिक्त निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन दाबावयाचे बिंदूही या ग्रंथात सांगितले आहेत. वाचकांनी हे दोन्ही ग्रंथ अवश्य संग्रही ठेवावेत.
१. बिंदूदाबन उपाय याचा अर्थ
शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आंतरिक अवयव कार्यान्वित करणे आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारणे, म्हणजे बिंदूदाबन उपाय.
२. बिंदूदाबन उपचारांमागील मूलभूत तत्त्व
मानवी शरिरामध्ये चेतना निरंतर वहात असते. चेतनेच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. शरिरावरील विशिष्ट बिंदू दाबून चेतनेच्या प्रवाहातील अडथळे दूर करता येतात. या विशिष्ट बिंदूंना दाबबिंदू असे म्हणतात.
३. बिंदूदाबन उपचारांच्या संदर्भातील सूचना
३ अ. बिंदूदाबन उपचारांना आरंभ करण्यापूर्वी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी !
हे देवते, तुझ्या कृपेने मी बिंदूदाबन उपचार करत आहे. या उपचारांमुळे माझा / या रुग्णाचा विकार (विकाराचा उल्लेख करावा.) लवकर दूर होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.
३ आ. नामजप करत बिंदूदाबन
सर्वांनीच, विशेषतः वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यांनी नामजप करत बिंदूदाबन उपचार करावेत !
३ इ. बिंदू दाबण्याविषयीच्या सूचना
१. दाबबिंदूवर अंगठा, तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट), टोक न काढलेली शिसपेन्सिल, लेखणीची (पेनची) बोथट बाजू किंवा तत्सम वस्तू यांद्वारे दाब द्यावा.
२. बोटावर दाब देतांना बोट चिमटीत पकडून दाब द्यावा.
३. रुग्णाला सहन होईल, एवढ्याच प्रमाणात दाब द्यावा.
४. बिंदूवर दाब देतांना तो सलगपणे न देता बिंदू एका सेकंदाला एकदा दाबून सोडावा.
५. प्रत्येक बिंदूवर साधारणपणे १ – २ मिनिटेच दाब द्यावा.
६. विकार बरा होईपर्यंत बिंदूदाबन उपचार दिवसातून न्यूनतम (कमीतकमी) एकदा आणि जास्तीतजास्त ४ – ५ वेळा करावेत.
७. बिंदूदाबन उपचार कोणत्याही वेळेत करता येत असले, तरी जेवणानंतर साधारण १ घंट्यापर्यंत (तासापर्यंत) ते न करणे अधिक योग्य ठरते.
४. प्रस्तुत लेखातील दाबबिंदूंच्या वर्णनासंदर्भातील सूचना
अ. बिंदूंच्या वर्णनाच्या आरंभी असलेले हृदय ७ (H 7), मोठे आतडे ४ (LI 4) यांसारखे शब्द म्हणजे बिंदूदाबन शास्त्रानुसार त्या बिंदूंची नावे आहेत.
आ. शरिराच्या मध्यरेषेवरील बिंदू सोडून अन्य बिंदू शरिराच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना असतात. उपचारांसाठी दोन्ही बाजूंवरील बिंदू दाबावेत.
इ. प्रत्येकाच्या शरिरातील विविध भागांची लांबी-रुंदी ही त्या व्यक्तीच्या बोटांच्या रुंदीच्या प्रमाणात असते. यासाठी येथे बिंदूचे स्थान दर्शवण्यासाठी आवश्यक असणार्या अंतराचे मोजमाप बोटांमध्ये सांगितले आहे. १ बोट अंतर म्हणजे एका बोटाच्या मधल्या सांध्याच्या सरासरी रुंदीएवढे अंतर.
५. सर्वसाधारण विकारांवरील दाबबिंदू
५ अ. थकवा येणे
१. पायाच्या करंगळीच्या मुळाशी सर्व बाजूंनी दाबावे.
२. हाताच्या करंगळीच्या मधल्या पेरावर सर्व बाजूंनी दाबावे.
५ आ. लठ्ठपणा
१. हृदय ७ (H 7) : हाताची करंगळी आणि अनामिका (करंगळीच्या जवळचे बोट) यांच्यामधील बेचक्यातून सरळ खाली येणार्या रेषेत मनगटाच्या घडीवर (आकृती १ मधील बिंदू १ पहा.)
२. हृदयावरण ६ (P 6) : मनगटाच्या घडीच्या मध्यापासून उभ्या सरळ रेषेत २ अंगठे खाली (*****टीप) (आकृती १ मधील बिंदू २ पहा.)
टीप – १ अंगठा अंतर म्हणजे अंगठ्याच्या मधल्या सांध्याच्या रुंदीएवढे अंतर.
५ इ. ताप येणे
१. हृदय ७ (H 7) : सूत्र ५ आ यातील उपसूत्र १ पहा.
२. मोठे आतडे ४ (LI 4) : हाताचा अंगठा तर्जनीला (अंगठ्याजवळच्या बोटाला) सरळ चिकटवल्यानंतर तळहाताच्या पाठच्या बाजूला या दोन्ही बोटांमधील घडी चालू होते, त्या ठिकाणी एक मांसल उंचवटा दिसतो. या उंचवट्याचा सर्वांत उंच बिंदू. (आकृती २ मधील बिंदू १ पहा.)
६. डोके आणि मेंदू यांच्याशी संबंधित विकारांवरील दाबबिंदू
६ अ. डोके दुखणे
१. पित्ताशय १४ (GB 14) : कपाळावर भुवईच्या मध्यापासून एक अंगठा वर (आकृती ३ मधील बिंदू १ पहा.)
२. त्रिऊष्मक २३ (TW 23) : भुवईच्या बाहेरच्या टोकावर (आकृती ३ मधील बिंदू २ पहा.)
६ आ. झोप न लागणे
१. अपवादात्मक १ (Ex 1) : सूत्र ८ अ यातील उपसूत्र १ पहा.
२. हृदय ७ (H 7) : सूत्र ५ आ यातील उपसूत्र १ पहा.
३. हृदयावरण ६ (P 6) : सूत्र ५ आ यातील उपसूत्र २ पहा.
७. डोळ्यांच्या सर्व विकारांवरील दाबबिंदू
अ. अपवादात्मक १ (Ex 1) : दोन्ही भुवयांच्या मध्यभागी (आकृती ४ मधील बिंदू १ पहा.)
आ. मूत्राशय १ (UB 1) : डोळ्याच्या आतील कोपर्यावर (आकृती ४ मधील बिंदू २ पहा.)
इ. मूत्राशय २ (UB 2) : भुवईच्या आतील टोकाजवळ (आकृती ४ मधील बिंदू ३ पहा.)
ई. अपवादात्मक ३ (Ex 3) : भुवईच्या मध्यावर (आकृती ५ मधील बिंदू१ पहा.)
उ. त्रिऊष्मक २३ (TW 23) : भुवईच्या बाहेरच्या टोकावर (आकृती ५ मधील बिंदू २ पहा.)
ऊ. पित्ताशय १ (GB 1) : डोळ्याच्या बाहेरच्या कोपर्यावर (आकृती ५ मधील बिंदू ३ पहा.)
ए. पोट १ (St 1) : डोळ्याच्या उभ्या मध्यरेषेत खोबणीच्या खालच्या कडेवर (आकृती ५ मधील बिंदू ४ पहा.)
८. पडसे (सर्दी), तसेच पडशामुळे नाक चोंदणे यांवरील दाबबिंदू
अ. पोट १ (St 1) : डोळ्याच्या उभ्या मध्यरेषेत खोबणीच्या खालच्या कडेवर (आकृती ६ मधील बिंदू १ पहा.)
आ. पोट २ (St 2) : डोळ्याच्या उभ्या मध्यरेषेत खोबणीच्या खालच्या कडेपासून १ बोट खाली (आकृती ६ मधील बिंदू २ पहा.)
इ. मोठे आतडे २० (LI 20) : नाकपुडीच्या बाहेरच्या बाजूला (आकृती ६ मधील बिंदू ३ पहा.)
९. खोकल्यावरील दाबबिंदू
अ. मूत्राशय ११ (UB 11) : डोके पूर्णपणे पुढे वाकवल्यावर मानेच्या खालच्या बाजूला दोन मणके ठळकपणे जाणवतात. यांतील खालच्या मणक्याच्या टोकाच्या पातळीला उभ्या मध्यरेषेपासून २ अंगठे बाजूला (आकृती ७ मधील बिंदू १ पहा.)
आ. मूत्रपिंड १ (Ki 1) : तळपायावर तर्जनी आणि मध्यमा यांच्यामधील बेचक्याच्या रेषेत बेचक्यापासून ४ बोटे अंतरावर (आकृती ८ मधील बिंदू १ पहा.)
१०. उच्च रक्तदाबावरील दाबबिंदू
अ. हृदय ३ (H 3) : हात कोपरामध्ये पूर्णपणे दुमडल्यावर कोपराच्या आतील बाजूला कोपराची घडी संपते, त्या ठिकाणी (आकृती ९ मधील बिंदू १ पहा.)
आ. मूत्रपिंड १ (Ki 1) : सूत्र १० यातील उपसूत्र आ पहा.
११. पचनसंस्थेच्या विकारांवरील दाबबिंदू
११ अ. उलटी (वांती) होणे आणि आम्लपित्त (अॅसिडिटी)
हृदयावरण ६ (P 6) : सूत्र ५ आ यातील उपसूत्र २ पहा.
११ आ. बद्धकोष्ठता (मलावरोध)
१. हनुवटीच्या मध्यावर दाब द्यावा. (आकृती १० मधील बिंदू १ पहा.)
२. मोठे आतडे ४ (LI 4) : सूत्र ६ इ यातील उपसूत्र २ पहा.
३. पोट रिकामे असतांना ते आत ओढून घेऊन बाहेर सोडणे, ही क्रिया १० वेळा करावी.
११ इ. अतीसार (जुलाब होणे)
मोठे आतडे ४ (LI 4) : सूत्र ६ इ यातील उपसूत्र २ पहा.
१२. मासिक पाळीसंदर्भातील सर्व समस्यांंवरील दाबबिंदू
मनगटाच्या दोन्ही कडांवर मनगटाच्या घडीपासून चार बोटे रुंदीपर्यंतच्या भागावर (आकृती ११ पहा.)
१३. मानसिक ताणावरील दाबबिंदू
अ. नियमन २० (GV 20) : दोन्ही कानांच्या भोकांना वरून जोडणार्या रेषेत डोक्यावर मध्यभागी (आकृती १२ मधील बिंदू १ पहा.)
आ. हृदय ७ (H 7) : सूत्र ५ आ यातील उपसूत्र १ पहा.
इ. हृदयावरण ६ (P 6) : सूत्र ५ आ यातील उपसूत्र २ पहा.
१४. आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त दाबबिंदू
हृदय ७ (H 7) : सूत्र ५ आ यातील उपसूत्र १ पहा.
संदर्भ : सनातनचे ग्रंथ “शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन (प्राथमिक ओळख)” आणि “नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार”
आगामी काळात भीषण आपत्तींतून वाचण्यासाठी
साधना करणे आणि भगवंताचे भक्त बनणे अपरिहार्य
भावी आपत्काळाचा धैर्याने सामना करता येण्यासाठी सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील विविध उपचारपद्धती शिकून घ्याव्यात. तथापि आपण कितीही उपचारपद्धती शिकून घेतल्या, तरी त्सुनामी, भूकंप अशा काही क्षणांत सहस्रो नागरिकांचा बळी घेणार्या महाभयंकर आपत्तींमध्ये जिवंत राहिलो, तरच त्यांचा उपयोग करू शकतो अशा आपत्तींत आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच भगवंताने आपल्याला वाचवावे, असे वाटत असेल, तर आपण साधना आणि भक्ती करायला हवी. श्रीकृष्णाने गीतेमध्ये न मे भक्तः प्रणश्यति । (अर्थ : माझ्या भक्तांचा नाश होणार नाही), असे वचन त्याच्या भक्तांना दिले आहे. याचाच अर्थ असा की, कोणत्याही आपत्तीतून वाचण्यासाठी आपल्याला साधना करणे अनिवार्य आहे.
फार छान
the information is very superb and useful thanks for such nice information