हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच व्रते यांवेळी रांगोळी काढली जाते. हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. सण, उत्सव तसेच विधी यांच्या वेळी त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते. ते तत्त्व अधिक प्रमाणात यावे आणि त्याचा सर्वांना लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व आकृष्ट, तसेच प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या काढाव्यात.
रांगोळी विषयक चलच्चित्रपट (Rangoli Videos : १२)
सात्त्विक रांगोळ्यांचे वैशिष्ट्य
सात्त्विक रांगोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातून प्रक्षेपित होणार्या देवतांच्या तत्त्वांमुळे उपासकाला शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या ५ प्रकारच्या अनुभूती येऊ शकतात.
श्री महालक्ष्मीदेवीशी संबंधित रांगोळ्या
या लेखात अनुक्रमे भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणार्या श्री महालक्ष्मीदेवीशी संबंधित रांगोळ्या देत आहोत. लक्ष्मीदेवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या देवीची नित्य पूजाअर्चा, उत्सव, व्रत इत्यादी प्रसंगी काढल्यास लक्ष्मीदेवीतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
१. भावाची अनुभूती देणारी रांगोळी
२. चैतन्याची अनुभूती देणारी रांगोळी
३. आनंदाची अनुभूती देणारी रांगोळी



याव्यतिरिक्त आनंदाची अनुभूती देणार्या रांगोळ्या आहेत.


श्रीकृष्णाशी संबंधित रांगोळ्या

वरील सर्व रांगोळ्यांमध्ये फिकट पिवळा, निळा, तसेच गुलाबी यांसारखे सात्त्विक रंग भरावेत.