हिंदूंनो, अष्टांग साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापूर येथे धर्मप्रेमींचे साधना शिबिर

सोलापूर – मनुष्यजन्मात गुरु असण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत शिक्षकाची आवश्यकता असते, तसेच जीवनात गुरूंची आवश्यकता असते. नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भावजागृती या टप्प्यांप्रमाणे अष्टांग साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त येथील धर्मप्रेमींचे ‘साधना शिबिर’ घेण्यात आले. त्यात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अलका व्हनमारे उपस्थित होत्या. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी उपस्थितांना ‘प्रार्थनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या की, धर्मशिक्षणाच्या अभावामुळे सध्या अनेक महिला सायंकाळी २-३ घंटे दूरदर्शनवरील मालिका पहाण्यात त्यांचा अमूल्य वेळ व्यय करतात; पर्यायाने मुलांना धर्मशिक्षण देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. धर्मशिक्षण घेतल्यास आपल्या परिवारातील एकही जण ‘लव्ह जिहाद’च्या संकटाला बळी पडणार नाही. धर्मशिक्षण घेण्यासाठी संपूर्ण कुटुंबियांसह सोलापूर येथे ठिकठिकाणी घेतल्या जाणार्‍या धर्मशिक्षणवर्गामध्ये सहभागी व्हा !

क्षणचित्र

अनेकांनी ‘शिबिरामध्ये सांगितलेला विषय योग्य होता, त्याप्रमाणे आम्ही कृती करू’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment